शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

काटोल, नरखेडची कोरोना साखळी तुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:14 IST

सावनेर/कळमेश्वर/ काटोल/ नरखेड/ उमरेड/ कुही /रामटेक/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाला मंगळवारी किंचित दिलासा मिळाला. सोमवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार ...

सावनेर/कळमेश्वर/ काटोल/ नरखेड/ उमरेड/ कुही /रामटेक/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाला मंगळवारी किंचित दिलासा मिळाला. सोमवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार १३ तालुक्यात १६७४ नवीन रुग्णांची भर पडली तर, २१ रुग्णांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात आतापर्यंत १,२०,४८४ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ८८,०९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मंगळवारी २,४३४ रुग्ण बरे झाले. सध्या ग्रामीण भागात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३०,३१५ इतकी आहे.

सावनेर तालुक्यात १३९ रुग्णांची भर पडली. यात सावनेर शहरातील ३५ तर ग्रामीण भागातील १०४ रुग्णांचा समावेश आहे. खापा आरोग्य केंद्रांतर्गत दोन रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात काटोल आणि नरखेड तालुक्यात कोरोनाची साखळी अबाधित आहे. काटोल तालुक्यात ४६५ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १३७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यात काटोल शहरातील ४० तर ग्रामीण भागातील ९७ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात कचारीसावंगा केंद्रांतर्गत ७६ तर येनवा केंद्रांतर्गत २१ रुग्णांची नोंद झाली.

नरखेड तालुक्यात १६१ रुग्णांची भर पडली. यात नरखेड शहरातील २० तर ग्रामीणमधील १४१ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २,८५६ तर शहरात ६८५ इतकी आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगावअंतर्गत येणाऱ्या गावात १०, जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावात (१२२), मेंढला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावात (५) तर मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावात चार रुग्णांची नोंद झाली.

कळमेश्वर तालुक्यात ८९ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प. क्षेत्रातील १६ तर ग्रामीण भागातील ७३ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात गोंडखैरी येथे १० तर धापेवाडा येथे सर्वाधिक ८ रुग्णांची नोंद झाली.

कुही तालुक्यातील विविध केंद्रांवर २१३ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात कुही येथे ५, मांढळ (४), वेलतूर (१०), साळवा (४) तर तितूर येथे ३ रुग्णांची नोंद झाली.

रामटेक तालुक्यात ४४ रुग्णांची भर पडली. यात रामटेक शहरातील १३ तर ग्रामीण भागातील ३१ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत ६,१०१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ४,७८२ कोरोनामुक्त झाले तर, १२३ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या तालुक्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १३१९ इतकी आहे. उमरेड तालुक्यात ४८ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ३१ तर ग्रामीण भागातील १७ रुग्णांचा समावेश आहे.

हिंगणा तालुक्यात पाच मृत्यू

हिंगणा तालुक्यात ४९६ नागरिकांची चाचणी करण्यात आली. तीत ९८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथील २४, टाकळघाट (१५), कान्होलीबारा, रायपूर, किन्ही धानोली व हिंगणा येथे प्रत्येकी ६, नीलडोह (५), गुमगाव, वागदरा, डिगडोह प्रत्येकी ४, कवडस (३), वडधामना, खैरी मोरे, देवळी पेंढरी, मांडवघोराड प्रत्येकी २ तर इसासनी, गिदमगड, गौराळा, मोहगाव ढोले, अडेगाव, वटेघाट, सालईदाभा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १०, ६५७ झाली आहे. यातील ८,२०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर, २३० रुग्णांचा मृत्यू झाला.