शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

काटोल जिल्हा हवाच

By admin | Updated: August 26, 2015 03:14 IST

काटोल परिसरातील सात तालुक्यांसाठी जिल्हा मुख्यालय हे लांब अंतरावर आहे.

नागपूर : काटोल परिसरातील सात तालुक्यांसाठी जिल्हा मुख्यालय हे लांब अंतरावर आहे. त्यांच्यासाठी काटोल हे मध्यवर्ती ठिकाण असून त्यातूनच काटोल जिल्हा व्हावा, ही मागणी पुढे आली. यासाठी आतापर्यंत कृती समितीच्यावतीने वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन केले, तसेच निवेदन देण्यात आले. या कृती समितीसोबतच या भागाचे आ. डॉ. आशिष देशमुख यांनी आता पुढाकार घेतला आहे. त्यांनी याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना मंगळवारी मुंबईत देण्यात आले. ‘जिल्हा निर्मितीवरून काटोलमधील वातावरण तापले’ शीर्षकांतर्गत मंगळवारी वृत्त प्रकाशित होताच त्याची दखल घेत आ. आशिष देशमुख यांनी हे निवेदन सोपविले. मध्यंतरी २२ नव्या जिल्ह्यांचा शासनदरबारी प्रस्ताव असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आले होते. मात्र त्यात काटोलचे नाव नव्हते. त्यामुळे काटोल येथील नागरिकांनी पुन्हा एकदा आंदोलनाची तयारी चालविली. तेथील वातावरणसुद्धा तापले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी असा एकाही जिल्ह्याचा प्रस्ताव नसल्याचे सांगितल्याने काहीअंशी काटोल भागातील नागरिक आणि कृती समिती शांत झाली. मात्र यापुढे आंदोलन करण्यात येईल, हे त्यांनी स्पष्ट केले. परिणामी तेव्हापासूनच जिल्हा निर्मितीवरून काटोलमध्ये धुसफूस सुरूच आहे. काटोल जिल्हा होणे हे कसे फायदेशीर आहे, याबाबत मंगळवारी ‘लोकमत’ने वृत्ताद्वारे प्रकाश टाकला. त्यात वेगवेगळ्या बाबी पुढे करीत काटोल जिल्ह्याची आवश्यकता असल्याचे पटवून देण्यात आले. त्याची दखल घेत आ. डॉ. आशिष देशमुख यांच्यासह अन्य सहकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईत जाऊन मुख्य सचिवांना निवेदन सोपविले. यावेळी आ. देशमुख यांच्यासोबत दिनकर राऊत आणि दिलीप हिवरकर उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)