शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

काटोल खून खटला; आरोपीला जन्मठेप

By admin | Updated: May 1, 2016 03:00 IST

काटोल येथे चाकूने हल्ला करून एकाला ठार आणि तीन जणांना जखमी केल्याच्या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाने ...

सत्र न्यायालय : दुकानाचे गाळे विकण्याच्या वादातून घडला होता थरारनागपूर : काटोल येथे चाकूने हल्ला करून एकाला ठार आणि तीन जणांना जखमी केल्याच्या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाने एका आरोपीला जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाच्या रकमेतील पाच हजार रुपये मृताच्या पत्नीला आणि प्रत्येकी एक हजार रुपये जखमींना नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. प्रेमचंद चंद्रभान चरडे (६३) असे आरोपीचे नाव असून, तो काटोलच्या चंडिका वॉर्ड दोडकीपुरा येथील रहिवासी आहे. नंदकिशोर नामदेव कोरडे (४०), असे मृताचे नाव होते. तो पंचवटी काटोल येथील रहिवासी होता. नंदकिशोरचे वडील नामदेव रघुनाथ कोरडे (७३), विलास महादेवराव चरडे (५६) आणि कुणाल ऊर्फ बाल्या गोविंदराव बाभूळकर (३५) रा. दोडकीपुरा, अशी जखमींची नावे आहेत. यातील जखमींपैकी विलास चरडे यांचे खटल्याची सुनावणी संपल्यानंतर नुकतेच आजाराने निधन झाले. या खटल्याची पार्श्वभूमी अशी, आरोपी प्रेमचंद चरडे याने आपल्या घरासमोरील स्वत:च्याच मोकळ्या जागेत दुकानाच्या गाळ्यांचे बांधकाम केले होते. त्यापैकी खालचे एक गाळे त्याने नामदेव कोरडे यांना २००२ मध्ये विकले होते. कोरडे यांनी तेथे शुभम पशू खाद्य भंडार नावाचे दुकान सुरू केले होते. व्यवस्थित बांधकाम करून न देता आगाऊ पैसे घेतल्याने कोरडे कुटुंब आणि प्रेमचंद चरडे यांच्यात भांडण होऊन वैमनस्य निर्माण झाले होते. खुनीहल्ल्याची ही थरारक घटना २६ सप्टेंबर २०१३ रोजी घडली होती. घटनेच्या वेळी नामदेव कोरडे हे आपल्या शुभम पशू खाद्य भंडारसमोर बसलेले होते, तर त्यांचा मुलगा नंदकिशोर हा शेजारच्या कुणाल बाभूळकर याच्या दुकानासमोर बसलेला होता. त्याच वेळी प्रेमचंद चरडे हा बाहेरून आला होता. त्याने अचानक नामदेव कोरडे यांच्या मानेवर चाकूने वार केले होते. त्यानंतर त्याने शेजारी राहणारे विलास चरडे यांच्या गळ्यावर, हातावर चाकूने वार केल्यानंतर तो डोक्यात सैतान संचारल्याप्रमाणे नंदकिशोर याच्याकडे धावला होता. त्याला खाली पाडून त्याच्या छातीवर, गळ्यावर चाकूने वार केले होते. त्यानंतर लागलीच तो रक्ताने भरलेल्या अवस्थेत कुणाल बाभूळकरच्या सलूनच्या दुकानात शिरला होता. तेथे कुणालच्या गळ्यावर आणि हातावर वार केले होते. या थरारक घटनेने परिसरात पळापळ झाली होती. काटोलमध्ये पसरली होती दहशतया घटनेने या भागात दहशत पसरून लोकांनी आपापली दुकाने बंद केली होती. आरोपी प्रेमचंद चरडे हा घटनास्थळावरून पळून गेला होता. जखमींना मेडिकल कॉलेज इस्पितळाकडे उपचारार्थ रवाना करण्यात आले असता, नंदकिशोर कोरडे याचा मृत्यू झाला होता. नंदकिशोरची आई रेखाबाई कोरडे यांच्या तक्रारीवरून काटोल पोलिसांनी भादंविच्या ३०२, ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल करून प्रेमचंद चरडे याला अटक केली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बी. एन. ठाकरे यांनी करून, आरोपीविरुद्ध न्यायालयात सबळ पुराव्यांसह आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला भादंविच्या ३०२ कलमांतर्गत जन्मठेप आणि सहा हजार रुपये दंड, भादंविच्या ३०७ कलमांतर्गत सात वर्षे सश्रम कारावास आणि चार हजार रुपये दंड सुनावण्यात आला. न्यायालयात सरकारच्या वतीने प्रमुख जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)