बेलाेना : बेलाेना (ता. नरखेड) येथे दरवर्षी श्रीदत्तजयंतीनिमित्त श्री बजरंगबलीच्या रथयात्रेचे आयाेजन केले जाते. तीन दिवस चालणाऱ्या या रथयात्रेवर यावर्षी काेराेनाचे सावट निर्माण झाले आहे.
यावर्षी श्रीदत्तजयंतीनिमित्त बेलाेना येथील श्री बजरंगबलीच्या रथयात्रेला २९ डिसेंबरला सुरुवात आणि ३१ डिसेंबरला समाराेप हाेणे अपेक्षित आहे. काेराेना संक्रमणामुळे या रथयात्रेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. यात्रेला परवानगी मिळावी म्हणून मंदिर ट्रस्ट, ग्रामपंचायत प्रशासन व भाविक जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करीत असून, ते यासंदर्भात तालुका व पाेलीस प्रशासनाशी चर्चा करीत आहेत.जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये पुढील कार्यक्रम निश्चित केला जाईल, अशी माहिती सरपंच दयाराम खंडारे व राम मंदिर ट्रस्टचे सचिव प्रमाेद राठाेड यांनी संयुक्तरित्या दिली.