शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोत्कृष्ट कार्यकर्त्यास देणार ‘कांशीरामजी रत्न’

By admin | Updated: March 16, 2017 02:27 IST

बसपा हा कॅडर बेस पक्ष म्हणून ओळखला जातो. परंतु अलीकडे हा कॅडर तुटत चालला आहे.

बसपा प्रदेश महासचिव जितेंद्र म्हैसकर यांची घोषणा : दर महिन्याला घेणार संघटनेचा आढावा नागपूर : बसपा हा कॅडर बेस पक्ष म्हणून ओळखला जातो. परंतु अलीकडे हा कॅडर तुटत चालला आहे. त्यामुळे बसपाने आता संघटना मजबुतीवर अधिक लक्ष घालण्यात सुरुवात केली आहे. त्याचा प्रत्यय कांशीराम यांच्या जन्मदिनानिमित्त बुधवारी आयोजित बसपाच्या संघटन आढावा बैठकीत दिसून आला. या बैठकीला मार्गदर्शन करताना बसपाचे प्रदेश महासचिव जितेंद्र म्हैसकर यांनी सांगितले की, संघटनेच्या कामाचा आता दर महिन्याला आढावा घेण्यात येईल, यात प्रत्येक कार्यकर्त्याच्या कामाचा आढावा घेतला जाईल. यातून संघटना वाढीसाठी ज्या कार्यकर्त्याने प्रामाणिकपणे सर्वोत्कृष्ट कार्य केले असेल, त्याला ‘कांशीरामजी रत्न’ या पुरस्काराने सन्मानित केले जाईल, अशी घोषणासुद्धा त्यांनी यावेळी केली. बसपाचे संस्थापक कांशीराम यांच्या जन्मदिनानिमित्त बसपातर्फे विदर्भ साहित्य संघाचे सभागृह सीताबर्डी येथे संघटना आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रदेश महासचिव जितेंद्र म्हैसकर, जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर, जिल्हा अध्यक्ष पृथ्वी शेंडे, को-आॅर्डिनेटर विवेक हाडके, रूपेश बागेश्वर, नवनीत धडाडे प्रामुख्याने उपस्थित होते. म्हैसकर यावेळी म्हणाले, कांशीराम यांचा संघटनेवर नेहमी भर राहत होता. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने संघटना मजबुतीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आपल्याला दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करावा. आता पक्षातर्फे दर महिन्याला संघटनेचा आढावा घेतला जाईल. यात कोणत्या कार्यकर्त्यावर कोणती जबाबदारी सोपविण्यात आली आहे, याचा आढावा गेतला जाईल. ज्याचे काम चांगले असेल त्याला सन्मानित केले जाईल. दर महिन्याला कांशीरामजी रत्न या पुरस्काराने कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाईल. यावेळी श्रीधर साळवे, संजय सोमकुवंर, सहदेव पिल्लेवान, अमित सिंग, योगेश लांजेवार, राजू केकाडे, सोनु समर्थ, शेषराव सेलारे उपस्थित होते.(प्रतिनिधी) नगरसेवकांचा सत्कार यावेळी नव्याने निवडून आलेल्या पक्षातील नगरसेवकांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यात नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, मो. जमाल, वंदना चांदेकर, वैशाली नारनवरे, मंगला लांजेवार, ममता सहारे, विरंका भिवगडे, नरेंद्र वालदे, संजय बुरेवार आदींचा समावेश होता.