शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

कन्हानमध्ये दोन गटात गोळीबार

By admin | Updated: March 26, 2015 02:39 IST

खंडणी वसुलीच्या वादातून दोन गटात गोळीबार झाल्याची घटना कन्हान शहरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली.

कन्हान : खंडणी वसुलीच्या वादातून दोन गटात गोळीबार झाल्याची घटना कन्हान शहरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. रेतीघाटावर खंडणी वसुलीचा वाद उफाळल्याने दोन गटात हाणामारी झाली. या घटनेनंतर दोन्ही गटात देशीकट्ट्याने गोळीबार व जोरदार हाणामारी झाली.कन्हानलगत असलेल्या सिहोरा रेतीघाटावर मंगळवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास कमलेश मेश्राम गटाचे पाच-सहा व्यक्ती शस्त्रांसह पोहोचले व तेथील रॉयल्टी वसुलीच्या झोपडीत असलेला फैजाम इजहार अहमद (३५, रा. गुजरीबाजार, कामठी) यांना धमकी दिली. चारचाकी वाहनाने आलेल्या सर्व आरोपींनी तेथील उभ्या ट्रकचे लाईट व काचा फोडल्या, तसेच ट्रकचालकाला काठीने मारहाण केली. याबाबत फिर्यादी फैजाम अहमद यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी कमलेश व इतर पाच जणांविरुद्ध भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३२४, ४२७ नुसार गुन्हा नोंदविला आहे.दरम्यान, हे सर्व आरोपी रेतीघाटावरून कन्हान शहरातील विवेकानंदनगर येथील योगेश यादव यांच्या घरी गेले. योगेश यादव व कमलेश मेश्राम या दोघांमध्ये आपसी वाद असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, शहरातील नारायणा शाळेलगत रात्री १०.३० ते १२.३० वाजताच्या सुमारास दोन्ही गटामध्ये तणाव निर्माण झाल्याने धारदार शस्त्रे व देशीकट्ट्याचा वापर झाल्याचे समजते. गोळीबाराच्या आवाजाने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणात योगेश यादव (२३) याच्या तक्रारीनुसार तो रेती सप्लायरचा व्यवसाय करीत असून कमलेशने त्याला खंडणीची मागणी केली होती. ती नाकारल्याने कमलेश व त्याच्या साथीदारांनी योगेश व त्यांच्या वडिलांच्या घरात शिरून तोडफोड केली. तसेच धारदार शस्त्राने मारहाण केली व देशीकट्ट्याने गोळीबार करून त्याच्या कुटुंबीयांना जखमी केले. याबाबत कन्हान पोलिसांनी कमलेश मेश्राम, उमेश यादव, विक्की यादव, नीलेश यादव, आकाश मेहतो, मनोज रॉच, मुकेश शर्मा, मोनू मनपिया, ताज, आकाश चांभारे, दादा मुळे यांच्याविरुद्ध भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ४२७ व आरडब्ल्यू ३/२५ अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.या घटनेनंतर योगेश यादव गटाने कमेलश मेश्राम याच्या चिकन सेंटर व घरावर हल्ला केल्याचे वृत्त आहे. कमलेशचा भाऊ नीलेश हरीचंद मेश्राम (३०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मंगळवारी रात्री ११.३० वाजता योगेशने आपल्या साथीदारांसह त्यांच्या घराचे दार तोडून आत प्रवेश केला. घरातील नीलेश व त्याचा भाऊ अकलेश, आई बारुबाई यांना धारदार शस्त्राने मारहाण करुन जखमी केले. तसेच कमेलशवर गोळीबार केला. यात पोलिसांनी योगेश यादव, राजा यादव, विपीन गोंडाने, गोलू यादव, राहुल व अन्य दोघांविरुद्ध भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ४५२, ४२७, ३२४, ३०७ नुसार गुन्ह्यांची नोंद केली.या घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी शहरात अतिशिघ्र कृती पोलीस दल तैनात केले. दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमित काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी कंत्तेवार यांनी भेट दिली. या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केली नसून ठाणेदार सुभाष माकोडे तपास करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)घटनेची पुनरावृत्तीकन्हान परिसरातील खदान भागात १७ नोव्हेंबर २०११ ला शीतलसिंह ऊर्फ मिठू याच्यावर गोळीबार झाला होता. त्यानंतर मागील वर्षी दिवाळीच्या दिवशी त्याची निर्घृण हत्या झाली. तसेच कन्हान येथील मोनिष रेड्डीवरही एकदा तारसा चौकात तर दुसऱ्यांदा ८ एप्रिल २०१३ ला एका जीममध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. त्यानंतर २४ जानेवारी २०१४ ला त्याच्या राहत्या घरी त्याची हत्या करण्यात आली. कन्हान व खदान भागात अशा घटनांची पुनरावृत्ती होत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रसाठा असून या भागात ‘सर्च आॅपरेशन’ सुरू करण्याची मागणी आहे. मात्र पोलीस विभागाच्या दुर्लक्षामुळे या भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून शहरात गॅगवारसारख्या घटना घडत आहेत.