शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

कळमना रिंग रोड बनला ‘अपघातप्रवण स्थळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ऑटोमोटिव्ह चौकाकडून कळमन्याकडे जाणाऱ्या बायपास रिंग रोडवरील एकता कॉलनी चौक अपघातप्रवण स्थळ बनले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ऑटोमोटिव्ह चौकाकडून कळमन्याकडे जाणाऱ्या बायपास रिंग रोडवरील एकता कॉलनी चौक अपघातप्रवण स्थळ बनले आहे. या चौकात अपघाताची संख्या प्रचंड वाढली आहे. त्याच शृंखलेत रविवारी रात्री जवळपास ११.३० वाजताच्या सुमारास या चौकात एका ट्रकच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अशा जीवघेण्या अपघाताने नागरिकांमध्ये भयाचे वातावरण पसरले आहे. मात्र, प्रशासन मूग गिळून बसल्याच्या अवस्थेत आहे. समस्यांचे निवारण करण्याच्या दृष्टिकोनातून कुठलेही पाऊल उचलले जात नसून, रहदारी विभागही ही बाब गांभीर्याने घेत नसल्याचे स्पष्ट होत आहे. गरज असतानाही या चौकात ट्रॅफिक पोलीस कधीच तैनात नसल्याचे दिसते. थोड्याच अंतरावरील ऑटोमोटिव्ह चौकात पोलीस चालान वसूल करण्यात व्यस्त असतात, हे विशेष.

एकता कॉलनी, यादवनगर ते पिवळी नदी क्षेत्राला जोडणाऱ्या रिंग रोडचे सिमेंटीकरण झाले आहे. परंतु, चौकात अद्याप ट्रॅफिक सिग्नल उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना येथून वहिवाट करताना संकटाचा सामना करावा लागतो. या रस्त्यावरून सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत अवजड वाहनांचा राबता असतो. विशेषत: हायवेकडे निघणाऱ्या ट्रकांची गर्दी मोठी असते. सिग्नल नसल्याने ट्रक वेगाने या चौकातून निघतात. याच कारणाने येथे अपघाताची संख्या वाढली आहे.

वडिलांचा मृत्यू, मुलगा गंभीर

यशोधरानगर ठाण्यातील नोंदीनुसार, रविवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास रिंगरोडच्या या चौकात अपघात झाला. आसीनगर निवासी मो. अनिस अन्सारी (६०) आणि मो. अकील अन्सारी (२०) हे दोघेही पिता-पुत्र दुचाकीने घराकडे जात होते. तेवढ्यात वीटभट्टी चौकाकडून येणाऱ्या ट्रक क्रमांक आर.जे. ४२, जी.ए. १८८८ ने त्यांना जबर धडक दिली. या घटनेने परिसरात खळबळ माजली. मेयो इस्पितळात उपचारादरम्यान अनिस अन्सारी यांचा मृत्यू झाला तर गंभीर अवस्थेतील मुलगा अकील अन्सारीवर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. यशोधरानगर पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात कलम ३०४ (ए), ३३८, १३४, १७७ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनीही घटनास्थळावर पूर्वी अनेक अपघात झाल्याचे सांगितले.

विरुद्ध दिशेने शिरतात ट्रक

रिंग रोडवर म्हाडा क्वॉर्टरला लागून एका शृंखलेत ट्रक उभे केले जातात. या दिशेने जाण्यासाठी ट्रकचालक विरुद्ध दिशेने ट्रक आणतात. त्यामुळे अपघाताचा प्रसंग ओढवला जातो. रात्रीच्या वेळी मनमानी पद्धतीने ट्रक उभे केले जातात. अंधारात ट्रक दिसत नसल्याने बऱ्याचदा योग्य दिशेने जाणारी वाहने धडकतात. परंतु, या घटनांना रोखण्याचे उपाय योजले जात नाहीत. याच तऱ्हेने पंतप्रधान गृह योजना म्हाडा क्वॉर्टरसाठी रस्त्यावरच टिनचे शेड उभारण्यात आले आहे. यामुळेही दोन्ही बाजूंनी जाणाऱ्या वाहनांना रिंग रोडकडे दोन्ही दिशेने येणारी वाहने दिसत नाहीत. यामुळेही अपघात वाढले आहेत.

.........