शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

न्या. बोबडे यांची कुलपती पदावर नियुक्ती झाल्याने शहरात आनंद

By admin | Updated: February 2, 2016 02:46 IST

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे यांची नागपुरातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या कुलपती पदावर नियुक्ती करण्यात आल्यामुळे

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे यांची नागपुरातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या कुलपती पदावर नियुक्ती करण्यात आल्यामुळे विधी क्षेत्रातील मान्यवरांनी आनंद व्यक्त केला आहे. ही नियुक्ती नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी ठरली आहे. न्यायमूर्ती बोबडे यांचा जन्म २४ एप्रिल १९५६ रोजी नागपुरात झाला. त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून १९७८ मध्ये कायद्याची पदवी पूर्ण केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकील म्हणून कार्यरत असताना, १९९८ मध्ये ते वरिष्ठ वकील झाले. मार्च- २००० मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती असताना त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. न्यायमूर्ती बोबडे यांचा कार्यकाळ नागपूरकरांसाठी नेहमीच अभिमानास्पद राहिला आहे. त्यांची आता महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या कुलपती पदावर नियुक्ती झाल्यामुळे नागपूरकरांची छाती पुन्हा एकदा अभिमानाने फुलली आहे. कुलपती पदावर नियुक्ती जाहीर झाल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून कामकाजाचा आढावा घेतला. तसेच, अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिलेत.(प्रतिनिधी)विद्यापीठाला चांगले भवितव्यन्यायमूर्ती शरद बोबडे हे कुलपती झाल्यामुळे महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला चांगले भवितव्य आहे. हे विद्यापीठ देशात नाव कमावेल. न्यायमूर्ती बोबडे हे मनमिळावू व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांची कुलपती पदावर नियुक्ती होणे आपले भाग्य आहे.- अ‍ॅड. किशोर लांबट, सर्वोच्च न्यायालय.अभिमानाची बाब आहेन्यायमूर्ती शरद बोबडे यांची नागपुरातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या कुलपती पदावर नियुक्ती होणे नागपूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. या विद्यापीठाला न्यायमूर्ती बोबडे हेच मोठे करू शकतात. त्यांना शैक्षणिक क्षेत्रात रुची आहे. - अ‍ॅड. अनिल किलोर, हायकोर्ट, नागपूर.