शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

न्या. भूषण धर्माधिकारी जन्मभूमीतून सेवानिवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 21:16 IST

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी हे त्यांची कर्मभूमी व जन्मभूमी असलेल्या नागपूरमधून सोमवारी सेवानिवृत्त झाले.

ठळक मुद्देशेवटच्या दिवशी नागपूर खंडपीठात केले काम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी हे त्यांची कर्मभूमी व जन्मभूमी असलेल्या नागपूरमधून सोमवारी सेवानिवृत्त झाले. शेवटच्या दिवशी त्यांनी नागपूर खंडपीठात कार्य केले. दरम्यान, त्यांच्या नेतृत्वातील पूर्णपीठाने पब्लिक ट्रस्ट मालमत्तेसंदर्भातील प्रकरणावर महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला.हायकोर्ट प्रशासन, न्यायमूर्ती, हायकोर्ट बार असोसिएशन आणि अनेक ज्येष्ठ वकिलांनी न्या. धर्माधिकारी यांना भावणिक वातावरणात निरोप दिला. याप्रसंगी सोशल डिस्टन्सिंग व अन्य नियमांचे तंतोतंत पालन करण्यात आले. न्यायमूर्तीपदी नियुक्ती होण्यापूर्वी न्या. धर्माधिकारी यांनी नागपूर खंडपीठासह विविध न्यायालयांत अनेक वर्षे वकिली केली. १५ मार्च २००४ रोजी त्यांची न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली. वरिष्ठतेनुसार ते अनेक महिने नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती होते. दरम्यान, त्यांना मुंबईत बोलावून घेण्यात आले. तेथून त्यांची २० मार्च २०२० रोजी मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, त्याच महिन्यात लॉकडाऊन लागू झाल्यामुळे त्यांना विविध खंडपीठांना भेट देण्यास वेळ मिळाला नाही. या काळात त्यांनी प्रशासकीय सुत्रे सक्षमपणे सांभाळली. न्यायालयांतून कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता त्यांनी केवळ अत्यावश्यक प्रकरणांवर सुनावणी घेणे, सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा उपयोग करणे, कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी करणे, सोशल डिस्टन्सिंगचे सक्तीने पालन करणे इत्यादी अनेक कठोर निर्णय घेतले.लॉकडाऊननंतर भव्य सत्कारहायकोर्ट बार असोसिएशन व अन्य वकील संघटना मिळून न्या. धर्माधिकारी यांच्या सत्कारासाठी भव्य कार्यक्रम आयोजित करणार होते. परंतु, लॉकडाऊनमुळे ते शक्य झाले नाही. हा कार्यक्रम लॉकडाऊन संपल्यानंतर आयोजित केला जाणार आहे. कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय व गुरुतुल्य असलेले न्या. धर्माधिकारी यांच्याबद्दल सर्वांच्या मनात अतिशय आदर आहे. त्यामुळे त्यांचा सत्कार कार्यक्रम व्हावा ही सर्वांची इच्छा आहे. निरोप कार्यक्रमात हायकोर्ट बार असोसिएशनच्या वतीने अध्यक्षा अ‍ॅड. गौरी वेंकटरमन, उपाध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील, सहसचिव भूषण मोहता उपस्थित होते अशी माहिती सचिव अ‍ॅड. प्रफुल्ल खुबाळकर यांनी दिली. 

 

टॅग्स :Courtन्यायालय