शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
4
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
5
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
6
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
7
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
8
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
9
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
10
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
11
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
12
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
13
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
14
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
15
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
16
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
17
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
18
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
19
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
20
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'

२५ कि.मी.च्या क्षेत्रात फक्त दोनच बस डेपो!

By admin | Updated: March 31, 2015 02:09 IST

शहराच्या सुनियोजित विकासासाठी नासुप्रने मेट्रो रिजनचे प्रारूप प्रसिद्ध केले. मात्र सार्वजनिक परिवहन व्यवस्थेसाठी यात

मेट्रो रिजन : लोकसंख्येनुसार १२ डेपो व १० बसस्टॅण्डची गरजराजीव सिंह ल्ल नागपूरशहराच्या सुनियोजित विकासासाठी नासुप्रने मेट्रो रिजनचे प्रारूप प्रसिद्ध केले. मात्र सार्वजनिक परिवहन व्यवस्थेसाठी यात विशेष अशी तरतूद करण्यात आलेली नाही. २५ किलोमीटर क्षेत्रफळाच्या पट्ट्यात फक्त दोन बस डेपोसाठी जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिहान, स्वत: मेट्रो रिजनच्या विकासासोबतच लोकसंख्या १५ लाखाने वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. अशापरिस्थितीत भविष्यात बस डेपोसाठी जागा अपुरी पडण्याची शक्यता आहे. निकषानुसार शहराच्या सीमेलगत मेट्रो रिजन क्षेत्रात १२ बस डेपो व १० बसस्टॅण्ड उभारण्याची गरज आहे. मेट्रो रिजनचे प्रारूप जाहीर झाल्यानंतर त्यावर बरेच आक्षेप आले आहेत. निवासी, आरक्षित, कृषी आदी जमिनींवर आक्षेप घेतले आहेत. चिंतामणी नगरी नंबर १, मानेवाडा निवासी एस. जे. सोनटक्के यांनी आक्षेप दाखल करीत सार्वजनिक परिवहन व्यवस्था बळकट करण्याची मागणी केली आहे. सध्या नागपूरची लोकसंख्या २५ लाख आहे. मेट्रो रिजनच्या २५ किलोमीटरच्या क्षेत्रात ७२१ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या भागाची लोकसंख्या १० ते १५ लाखांच्या घरात आहे. निकषानुसार एक लाख लोकसंख्येमागे ५० बस आवश्यक आहे. नागपूर शहर व मेट्रो रिजनच्या एकत्रित लोकसंख्येचा विचार केला तर १७५० बसची आवश्यकता आहे. येत्या काळात लोकसंख्येत आणखी वाढ होईल. महापालिकेकडे सध्या फक्त ४७० बस आहेत. त्यातील जवळपास ५० टके बस नादुरुस्त आहेत. शहर बसच्या देखभाल दुरुस्तीसाठी डेपो नाही. यशवंत स्टेडियम, बैद्यनाथ चौक, हिंगणा रोड येथे स्टार बसची दुरुस्ती केली जाते. (प्रतिनिधी)अशा आहेत सूचना मेट्रो रिजनअंतर्गत शहरी भागासाठी १७५० बसची गरज.मेट्रो रिजनअंतर्गत कामठी, मौदा, उमरेड, बुटीबोरी, हिंगणा, पिपळा फाटा, बेसा, खापरखेडा, वाडी, काटोल नाका, कळमेश्वर येथे बस डेपो व बसस्टॅण्ड तयार केले जावे. शहर बससाठी मध्य भागात एक मोठे बसस्टॅण्ड असावे. मेट्रो रिजनमध्ये प्रत्येक दोन कि.मी. अंतरावर प्रवाशांसाठी प्रवासी निवारा उभारण्यात यावा. मेट्रो रिजनच्या विकास आराखड्यात परिवहनासाठी ५१९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून ती अत्यल्प आहे.