शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जलसाठ्यात फक्त एक टक्कावाढ

By admin | Updated: June 30, 2017 02:27 IST

जून महिना संपत आला तरी पाहिजे तसा पाऊस अजूनही पडलेला नाही. मान्सूनची चाल सुस्तावल्याने एकीकडे उकाडा वाढला आहे

विभागातील जलाशयात केवळ ११ टक्के साठा : जूनमध्ये मान्सूनची चाल संथ लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जून महिना संपत आला तरी पाहिजे तसा पाऊस अजूनही पडलेला नाही. मान्सूनची चाल सुस्तावल्याने एकीकडे उकाडा वाढला आहे तर दुसरीकडे जलाशयेसुद्धा कोरडी पडली आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीला नागपूर विभागातील मोठ्या जलाशयांमध्ये केवळ १० टक्के जलसाठा शिल्लक होता. आता महिना संपत आला तरी जलसाठ्यात केवळ एक टक्काच भर पडली आहे. नागपूर विभागातील १८ मोठ्या धरणांमध्ये आजच्या तारखेला केवळ ३२८ दलघमी (११ टक्के) इतका जलसाठा शिल्लक आहे. आजच्या तारखेचाच विचार केला असता गेल्या पाच वर्षात सर्वात कमी जलसाठा याच वर्षी असल्याचे दिसून येते. जलसंपदा विभागाअंतर्गत नागपूर विभागात पाटबंधारे प्रकल्पांचे १८ मोठे तलाव आहेत. यातील एकूण पाणीसंचयनाची क्षमता २९६४.४ दलघमी इतकी आहे. यापैकी आजच्या तारखेला केवळ ३२८ दलघमी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये सर्वात मोठे धरण असलेल्या तोतलाडोह धरणात केवळ ३४ दलघमी (३ टक्के) इतका पाणीसाठा आहे. कामठी खैरी ३८ टक्के, रामटेक ११ टक्के, लोवर वडगाव १८ टक्के, इडियाडोह १४ टक्के, सिरपूर १ टक्के, पूजारी टोला २३ टक्के, असोलामेंढा ४० टक्के, दिना १३ टक्के, बोर १४ टक्के, धाम १६ टक्के, पोथरा २५ टक्के, लोवर वर्धा टप्पा -१ येथे १६ टक्के, बावनथडी १२ आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २ येथे केवळ १ टक्का इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. भंडारा येथील गोसीखुर्द टप्पा-१, नागपुरातील गोंदिया येथील कालीसरार या तलावातील पाणीसाठा संपलेला आहे. गेल्यावर्षी आजच्याच तारखेला १९ टक्के साठा गेल्या वर्षी आजच्याच तारखेला या १८ ही तलावात एकूम पाणीसाठा ६३२ दलघमी (१९ टक्के) इतका होता. तसेच २०१२ मध्ये ७४५ दलघमी, २०१३ मध्ये १२१५ दलघमी, २०१४ मध्ये १४३१ दलघमी आणि २०१५ मध्ये ९३० दलघमी इतका पाणीसाठी आजच्या तारखेला २९ जून) रोजी होता.