शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जरा हटके! बॉडीबिल्डींग स्पर्धा जिंकलेला पहिला ट्रान्सपुरुष; आर्यन पाशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 10:38 IST

एखाद्या बॉडीबिल्डींग स्पर्धेत उतरून दुसरे बक्षीस पटकावणे हा काही फार मोठा भाग आता उरलेला नाही. मात्र असे दुसरे बक्षीस पटकावण्याचा मान जेव्हा एखादा ट्रान्सजेंडर घेतो तेव्हा ती आश्चर्याने भुवया उंचावणारी बाब ठरते.

ठळक मुद्देनायला पाशा ते आर्यन पाशाचा खडतर प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: सध्याच्या जिम सॅव्ही पिढीकरिता एखाद्या बॉडीबिल्डींग स्पर्धेत उतरून दुसरे बक्षीस पटकावणे हा काही फार मोठा भाग आता उरलेला नाही. मात्र असे दुसरे बक्षीस पटकावण्याचा मान जेव्हा एखादा ट्रान्सजेंडर घेतो आणि तेही भारतात प्रथमच तेव्हा ती आश्चर्याने भुवया उंचावणारी बाब ठरते.अलीकडेच म्हणजे १ डिसेंबर रोजी आर्यन पाशा या २६ वर्षीय तरुणाने नवी दिल्ली येथे आयोजित बॉडीबिल्डींग स्पर्धेत हा पराक्रम करून दाखवला आहे.व्यवसायाने वकील असलेल्या आर्यन पाशाची कहाणी ही नायला पाशा या मुलीच्या नावापासून सुरू होते.सहा वर्षांच्या नायलाने जेव्हा शाळेत जाण्यासाठी मुलांचा गणवेश घालण्याचा हट्ट धरला, तो तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबियांसाठी पहिला प्रसंग होता, तिच्यातले वेगळेपण समजून घ्यायचा. पण जवळपास सर्वच ट्रान्सजेंडर्सच्या आयुष्यात घडते तसे नायलाच्याहीबाबतीत घडले. कुटुंबियांनी तिला मुलांचे कपडे घालण्यास नकार दिला. पुढे वेगवेगळ््या क्रीडास्पर्धांमध्ये तिच्यातील चुणूक सर्वांना समजत गेली. मात्र तिला स्त्रियांच्या कॅटेगरीत भाग घेऊन स्पर्धेत उतरणे मान्य होत नव्हते.पुढे होणारे शारीरिक बदल तिला अधिकच नैराश्य देत राहिले. मात्र तिच्या आईने तिच्यातील हे बदल ओळखून तिला ट्रान्सजेंडर होण्याचा सल्ला दिला. वयाच्या १८ व्या वर्षी तिने दोन मोठ्या लिंग परिवर्तनाच्या शस्त्रक्रियांना तोंड दिले आणि ती अखेरीस पुरुष बनली. या खडतर प्रवासात तिला कुटुंबाने पूर्ण सहकार्य दिले. नायलाचा आर्यन बनला.यानंतर आपले शिक्षण पूर्ण करीत आर्यनने वकिलीची पदवी घेतली. सोबतच आपली बॉडीबिल्डींगची आवड जोपासत शरीरयष्टी कमवित राहिला. त्यावर पहिले सामाजिक शिक्कामोर्तब या स्पर्धेने केले आहे. १२५ पुरुषांमधून दुसरा क्रमांक पटकावत आर्यनने आपल्या मेहनत व जिद्दीचा परिचय जगाला करून दिला आहे.

टॅग्स :Transgenderट्रान्सजेंडर