शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जरा हटके! नागपुरातील ९९९ श्वानांनी केला ‘एसी’ प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 10:57 IST

जानेवारी ते डिसेंबर २०१८ या कालावधीत नागपुरातील ९९९ श्वानांनी एसी कोचने प्रवास केल्याची माहिती आहे. त्यासाठी रेल्वेला तब्बल २.१६ लाखांचा महसूल मिळाला.

ठळक मुद्देरेल्वेला २.१६ लाखाचे उत्पन्न एक तासापूर्वी करावे लागते बुकिंग

दयानंद पाईकराव ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेच्या एसी क्लासचे तिकीट म्हटले की ते सर्वसामान्य प्रवाशांना परडवत नाही. त्यामुळे साधारण प्रवासी स्लिपर क्लासचे आरक्षण करून प्रवास करतात. जर कुणी नागपुरातील ९९९ श्वानांनी एसी कोचमधून प्रवास केल्याचे सांगितले तर त्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण ते खरे आहे, जानेवारी ते डिसेंबर २०१८ या कालावधीत नागपुरातील ९९९ श्वानांनी एसी कोचने प्रवास केल्याची माहिती आहे. त्यासाठी रेल्वेला तब्बल २.१६ लाखांचा महसूल मिळाला.श्वान म्हटले की या गल्लीतून त्या गल्लीत भटकंती करणारा प्राणी. परंतु काही श्वान पाळीव असल्यामुळे त्यांची खास खबरदारी घेण्यात येते. फिरायला गेले की त्याला सोबत नेणे, खाण्यासाठी महागड्या डॉगफूडची व्यवस्था करण्यात येते. परंतु खरी पंचाईत होते ती श्वान पाळलेल्या कुटुंबास बाहेरगावी जाताना. आपल्या लाडक्या ‘डॉगी’ला कुठे ठेवावे, असा प्रश्न त्यांना पडतो. मागील वर्षी शहरातील ९९९ नागरिकांनी आपल्या श्वानांना एसी डब्याचा प्रवास घडविला. यात वर्षभरात ५७२ बकऱ्यांनीही रेल्वेने प्रवास केल्याची माहिती आहे. यासाठी रेल्वेला तब्बल २ लाख १६ हजार ६७८ रुपयांचे उत्पन्न मिळाले.

अशी आहे प्रक्रियाश्वानाला रेल्वेतून नेण्यासाठी गाडी सुटण्याच्या एका तासापूर्वी बुकिंग करावे लागते. श्वानाला फक्त एसी फर्स्ट क्लासने नेता येऊ शकते. या डब्यात वेगवेगळे ‘कुपे’ (कंपार्टमेंट) असल्यामुळे इतर प्रवाशांना त्याचा त्रास होत नाही. परंतु एखाद्या प्रवाशाकडे एसी टु टायर, एसी थ्री टायर किंवा स्लिपर क्लासचे तिकीट असेल आणि त्यास आपल्या श्वानाला सोबत न्यायचे असेल, तर त्याला गार्डच्या‘ब्रेक व्हॅन’मधील पिंजºयात ठेवावे लागते. तेथे त्या श्वानाच्या खानपानाची व्यवस्था संबंधित प्रवाशास करावी लागते.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे