शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

"लोकशाहीच्या नावाने ओरड करणारे सभागृहात केवळ ४६ मिनिटेच उपस्थित"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2022 20:44 IST

Nagpur News जे लोक रोज लोकशाहीबाबत ओरड करतात ते सभागृहात केवळ ४६ मिनिटे उपस्थित होते. यावरून त्यांचे लोकशाहीवर खरोखर किती प्रेम आहे हे लक्षात येत आहे, या शब्दांत फडणवीस यांनी ठाकरेंबाबत वक्तव्य केले.

ठळक मुद्दे वडिलांना घाबरलो नाही, तर आदित्यला काय घाबरणार ?

योगेश पांडे नागपूर : हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. जे लोक रोज लोकशाहीबाबत ओरड करतात ते सभागृहात केवळ ४६ मिनिटे उपस्थित होते. यावरून त्यांचे लोकशाहीवर खरोखर किती प्रेम आहे हे लक्षात येत आहे, या शब्दांत फडणवीस यांनी ठाकरेंबाबत वक्तव्य केले. विधीमंडळ अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

हिवाळी अधिवेशनात खूप काम झाले. विरोधकांनी कामावर सुरुवातीला बहिष्कारदेखील घातला. मात्र काम पूर्ण झाले. विरोधकांनी विविध माध्यमातून आरोप केले, मात्र आम्ही त्यांना उघडे पाडले. आदित्य ठाकरे यांनी वयाचा दाखला देत काही आरोप केले. मात्र आम्हाला त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आम्ही राज्याच्या विकासाकडे लक्ष देत आहोत. आम्ही त्यांच्या वडिलांनाच घाबरलो नाही तर त्यांना काय घाबरू. त्यांच्या नाकाखालून ५० आमदार काढले तेव्हा मुंबईत आग लागेल असे इशारे देण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात आगपेटीची काडीदेखील पेटली नाही, असे फडणवीस म्हणाले. अजित पवारांनी बावनकुळे यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून फडणवीस यांनी चिमटा काढला. आमचे मिशन बारामती आहेच. पण मिशन महाराष्ट्रदेखील आहे. बहुतेक बावनकुळे या मिशनसाठी बारामतीला गेल्यामुळेच अजित पवार यांना राग आला असावा असे ते म्हणाले.

विरोधकांनी तारतम्य बाळगावे : मुख्यमंत्री

यंदाच्या अधिवेशनात विरोधक सभागृहापेक्षा बाहेरच जास्त बोलले. विविध मुद्दे उकरून काढत त्यांनी विविध आरोप करण्याचे प्रयत्न केले. मात्र ते यशस्वी होऊ शकले नाही. विधानसभा अध्यक्षांनी खूप चांगले काम केले. कायद्याचे ते तज्ज्ञ आहेत. असे असतानादेखील त्यांच्यावर पातळी सोडून आरोप करण्यात आले. विरोधकांनी कमीतकमी अध्यक्षांबाबत बोलताना तरी तारतम्य बाळगावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. विरोधकांचा सावळागोंधळ अधिवेशनात समोर आला व गोंधळलेली स्थिती दिसून आली, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन