शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांडावरील निर्णय राखीव

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: May 12, 2023 16:45 IST

Nagpur News सरकार व बचाव पक्षाचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष सत्र न्यायालयाचे न्या. एस. बी. गावंडे यांनी शहरातील बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड खटल्यावरील निर्णय राखीव ठेवला आहे.

राकेश घानोडेनागपूर : सरकार व बचाव पक्षाचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष सत्र न्यायालयाचे न्या. एस. बी. गावंडे यांनी शहरातील बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड खटल्यावरील निर्णय राखीव ठेवला आहे. निर्णय लवकरच जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

गणेश शिवभरण शाहू हा या हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. इतर आरोपींमध्ये गणेशची पत्नी गुडिया ऊर्फ गुड्डी, भाऊ अंकित व एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. ते सर्व पवनपुत्रनगर, हुडकेश्वर येथील रहिवासी आहेत. या न्यायालयात अल्पवयीन मुलगा वगळता इतर तीन आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ३९४, ३६४, २०१, १२०-ब, ३४ व ॲट्रॉसिटी कायद्यातील कलम ३ (२) (५) हे दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत. उषा कांबळे व राशी कांबळे, अशी मृतांची नावे होती. सरकारच्या वतीने विशेष वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली. त्यांनी आरोपींविरुद्धचे गुन्हे सिद्ध करण्यासाठी ३५ साक्षीदार तपासले. तसेच, वैद्यकीय अहवालासह इतर विविध ठोस पुराव्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. फिर्यादी रविकांत कांबळे यांचे वकील ॲड. समीर सोनवणे यांनी त्यांना सहकार्य केले. आरोपींच्या वतीने ॲड. आर. एम. भागवत व ॲड. अनिरुद्ध चांदेकर यांनी युक्तिवाद केला. 

फेब्रुवारी २०१८ मधील घटनाही घटना १७ फेब्रुवारी २०१८ रोजी घडली. त्या दिवशी आरोपी गणेश व उषा कांबळे यांच्यामध्ये भिशीच्या पैशांवरून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी उषा यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या दीड वर्षीय राशीचाही निर्घृण खून केला आणि त्यांचे मृतदेह उमरेड रोडवरील विहीरगावाजवळच्या नाल्यात फेकून दिले, अशी तक्रार आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय