शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

संपादित जमिनीच्या मोबदल्यावर शेतकरी हिताचा निवाडा

By admin | Updated: October 11, 2015 03:24 IST

महाराष्ट्र औद्योगिक विकास कायदा-१९६१ अंतर्गत करण्यात येणाऱ्या भूसंपादनाच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शेतकरी हिताचा निवाडा दिला आहे.

राकेश घानोडे नागपूरमहाराष्ट्र औद्योगिक विकास कायदा-१९६१ अंतर्गत करण्यात येणाऱ्या भूसंपादनाच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शेतकरी हिताचा निवाडा दिला आहे. या कायद्यांतर्गत जमीन संपादित झाली असल्यास संबंधित शेतकऱ्यांना भूसंपादन कायदा-१८९४ मधील कलम २८-अ अंतर्गतही वाढीव मोबदल्यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज सादर करता येतो यावर या निवाड्यामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. या निवाड्याचा लाभ राज्यातील असंख्य शेतकऱ्यांना होणार आहे.न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व अनंत बदर यांनी टाकळघाट (जि. नागपूर) येथील ४५ शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या पाच वेगवेगळ्या याचिका निकाली काढताना हा निवाडा दिला आहे. १९८८-८९ मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास कायद्याच्या कलम ३२ अंतर्गत याचिकाकर्त्यांची जमीन संपादित करण्यात आली होती. १९९१-९२ मध्ये भूसंपादन अधिकाऱ्याने याचिकाकर्त्यांना अवॉर्ड जारी केला. अपेक्षेपेक्षा कमी मोबदला मिळाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास कायद्याच्या कलम ३४ व भूसंपादन कायद्याच्या कलम १८ अंतर्गत दिवाणी न्यायालयात अर्ज सादर केला. दिवाणी न्यायालयाने अर्जदारांना मोबदला वाढवून दिला. हा आदेश लक्षात घेता याचिकाकर्त्यांनी भूसंपादन कायद्याच्या कलम २८-अ अंतर्गत विशेष भूसंपादन अधिकाऱ्याकडे वेगवेगळे अर्ज सादर करून मोबदला वाढवून देण्याची मागणी केली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने यावर आक्षेप घेऊन भूसंपादन कायद्यातील २८-अ ही कलम महाराष्ट्र औद्योगिक विकास कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या भूसंपादनास लागू होत नसल्याचा दावा केला. विशेष भूसंपादन अधिकाऱ्याने हा आक्षेप मान्य करून याचिकाकर्त्यांचे अर्ज नामंजूर केले होते. या आदेशाविरुद्ध याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा देऊन भूसंपादन कायदा-१८९४ मधील २८-अ ही कलम महाराष्ट्र औद्योगिक विकास कायदा-१९६१ अंतर्गत करण्यात आलेल्या भूसंपादनासही लागू होते यावर मोहोर उमटवली आहे.