शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

न्यायमंदिर इमारत ‘अंडर सर्व्हिलन्स’

By admin | Updated: April 1, 2017 03:04 IST

संपूर्ण न्यायमंदिर इमारत आता ‘ अंडर सर्व्हिलन्स’ मध्ये आली असून आत आणि सभोवताल ६८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत.

राज्यातील पहिलेच जिल्हा न्यायालय : ६८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले राहुल अवसरे  नागपूर संपूर्ण न्यायमंदिर इमारत आता ‘ अंडर सर्व्हिलन्स’ मध्ये आली असून आत आणि सभोवताल ६८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. सीसीटीव्ही नेटवर्कने सुसज्ज करण्यात आलेले राज्यातील हे पहिलेच जिल्हा न्यायालय आहे. न्यायमंदिर इमारतीमध्ये दिवसेंदिवस गर्दी वाढत असल्याने सुरक्षेचा प्रश्न भेडसावत होता. आजवर जिल्हा न्यायालयात घडलेल्या घटना जगाचे लक्ष वेधणाऱ्या ठरल्या आहेत. जरीपटका कस्तुरबानगर येथील कुख्यात गुंड अक्कू यादव याची न्यायालय कक्षात महिला व पुरुषांच्या जमावाकडून हत्या, हातकडीतील कुख्यात समशेरवर हल्ला करणाऱ्या कुख्यात राजू रजवाडे हा फौजदाराच्या गोळीबारात ठार, कुख्यात अनिल पौनीपगार याच्यावरील न्यायाधीशाच्या कक्षात खुनी हल्ला, हातकडीतील आणि स्टेनगनधारी पोलीस एस्कॉर्टमधील पिंटू शिर्के याची न्यायमंदिराच्या सहाव्या मजल्यावर कुख्यात विजय मते, राजू भद्रे आणि साथीदारांकडून हत्या, ट्रेझरी बाररूममध्ये गावठी बॉम्बचा स्फोट, सीताबर्डी टोळीयुद्धातील गुंडांची न्यायालय कक्षात चकमक, अ‍ॅड. श्रीकांत खंडाळकर यांचा संशयास्पद मृत्यू, अशा घटना घडल्या आहेत. जिल्हा बार असोसिएशनकडून जिल्हा न्यायालय सुरक्षेसाठी स्थायी स्वरूपाची पोलीस चौकी, डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली जात होती. त्यापैकी पोलीस चौकी उभारून पुरेसे पोलीस बळही तैनात करण्यात आले. मेटल डिटेक्टर बसविण्यात आले. परंतु निधीअभावी बऱ्याच काळापासून सीसीटीव्हीचे काम रेंगाळले होते. सीसीटीव्हीची आग्रही मागणी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश जयस्वाल आणि सचिव नितीन तेलगोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करून सतत पाठपुरावा केला. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावरून जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी ६८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था केली. कोर्ट मॅनेजर संजय सिंग यांच्या देखरेखीखाली प्रत्येक मजल्यावर सात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. बाहेरही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे न्यायमंदिर इमारतीमध्ये किंवा आवारात येणारी प्रत्येक व्यक्ती ‘ अंडर सर्व्हिलन्स’ राहणार आहे.