कॉंग्रेसविरोधातील आक्रमक भूमिका : संघ पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेदनागपूर : देशात असहिष्णुतेसाठी संघाला जबाबदार ठरविणाऱ्या कॉंग्रेसविरोधात संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ.मनमोहन वैद्य यांनी थेट हल्लाबोल केला होता. या आक्रमक भूमिकेवर संघ वर्तुळातदेखील आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. परंतु अशी संघाची भूमिका नसल्याचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी शनिवारी स्पष्ट केले. अशा परिस्थितीत संघ पदाधिकाऱ्यांमध्येच मतभेद आहेत की काय असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून दादरी येथे झालेली हत्या व त्यानंतर साहित्यिकांचा पुरस्कार परत करण्याचा क्रम यामुळे देशात आरोप-प्रत्यारोपांचे प्रमाण वाढले आहे. देशात असहिष्णुता वाढते आहे, असा आरोप लावत साहित्यिकांकडून पुरस्कार परत करण्यात येत आहेत. या परिस्थितीसाठी संघ जबाबदार असल्याची टीका कॉंग्रेसकडून करण्यात आली होती. एरवी संघाकडून कुठल्याही टीका किंवा आरोपांना महत्त्व देऊन प्रत्युत्तर देण्यात येत नाही. परंतु डॉ. मनमोहन वैद्य यांनी यासंदर्भात थेट कॉंग्रेसविरुद्धच आक्रमक पवित्रा घेतला. संघाची नेमकी भूमिका काय?डॉ.मनमोहन वैद्य यांनी कॉंग्रेसविरोधातील त्यांचे वक्तव्य ‘टष्ट्वीटर’वरदेखील ‘पोस्ट’ केले होते. शिवाय संघाचे अधिकृत पदाधिकारीच संघातर्फे भूमिका मांडतात असे त्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. परंतु भय्याजी जोशी यांनी ही संघाची भूमिका नसल्याचे प्रतिपादन केल्यामुळे संभ्रम वाढला आहे. असहिष्णुतेच्या मुद्यावरून संघ आक्रमक होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वैद्य यांच्या भूमिकेला जोशींचा सुरुंग
By admin | Updated: November 8, 2015 02:47 IST