शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

पवार-आझाद करणार  नागपूर विधिमंडळावरील मोर्चाचे संयुक्त नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 22:42 IST

आॅनलाईन लोकमतनागपूर : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर १२ डिसेंबरला मोर्चा काढला जाणार आहे. यात शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, रिपब्लिकन पक्ष यासह सर्व विरोधी पक्ष सहभागी होणार आहेत. काँग्रेसतर्फे पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे मोर्चाला संयुक्त नेतृत्व राहणार ...

ठळक मुद्देअशोक चव्हाण यांनी घेतला तयारीचा आढावानेतृत्त्वासाठी चढाओढ नाही

आॅनलाईन लोकमतनागपूर : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर १२ डिसेंबरला मोर्चा काढला जाणार आहे. यात शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, रिपब्लिकन पक्ष यासह सर्व विरोधी पक्ष सहभागी होणार आहेत. काँग्रेसतर्फे पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे मोर्चाला संयुक्त नेतृत्व राहणार आहे, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी गुरुवारी स्पष्ट केले.अधिवेशनावर काँग्रेसतर्फे १३ डिसेंबरला तर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे ११  डिसेंबरला  वेगवेगळे मोर्चे काढले जाणार होते. परंतु चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून १२ डिसेंबरला संयुक्त मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र १२ तारखेलाच शरद पवार यांचा वाढदिवस आहे व पवार या मोर्चात सहभागी होणार असल्याने मोर्चात पवारांच्या छायेखाली काँग्रेस दबल्या जाईल, या भितीने काँगे्रसच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता निर्माण झाली होती. पवारांच्या नेतृत्वावर काहींनी नाराजीही व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर पवार व आझाद हे मोर्चाचे संयुक्त नेतृत्व करणार असल्याचे स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिल्याने काँग्रेसजणांना दिलासा मिळाला आहे. मोर्चासाठी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. परंतु गुजरात निवडणुकीमुळे त्यांचा व्यस्त कार्यक्रम असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.मोर्चाच्या तयारीसाठी चव्हाण यांनी नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांतील प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांची मंगल कार्यालयात आढावा बैठक घेतली. जिल्हानिहाय आढावा घेतला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, आ. विजय वडेट्टीवार, सुनील केदार,माजी खासदार मारोतराव कोवासे, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, माजी आ. एस.क्यू. जमा,सुभाष धोटे, अविनाश वारजूरकर, डॉ.बबनराव तायवाडे, अनंतराव घारड, सुरेश भोयर, प्रफुल्ल गुडधे, उमाकांत अग्निहोत्री, अतुल कोटेचा, अ‍ॅड.अभिजित वंजारी, रवींद्र दरेकर, नाना गावंडे, चंद्रपाल चौकसे, कुंदा राऊत, बंडू धोत्रे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.टी पॉईंट चौकात दोन्ही मोर्चे एकत्र  विधानभवनावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे वेगवेगळ्या ठिकाणावरून मोर्चे निघतील. परंतु टी-पॉईट चौकात भेटतील. येथे संयुक्त जाहीर सभा होईल, असे चव्हाण यांनी सांगितले.कर्जमाफीच्या नावाखाली फसवणूकदोन वर्षापूर्वी काँग्रेसने कर्जमाफीसाठी भव्य मोर्चा काढला होता. आता परिस्थिती आणखी बिकट झाली. ९० लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफीची घोषणा केली होती. पण चार ते पाच हजार शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळाली. कर्जमाफीच्या नावाखाली भाजपा सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.खा. अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :Politicsराजकारण