शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  जेट एअरवेजच्या विमानात २००प्रवाशांचा गोंधळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:23 IST

विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्याचे कारण देत जेट एअरवेजच्या विमानात दोन तास बसवून खाली उतरविलेल्या २०० प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घातला. विमान कंपनीने सत्यस्थिती न सांगितल्यामुळे प्रवाशांना आलेला अनुभव अत्यंत वेदनादायी होता, अशी प्रतिक्रिया तुषार मंडलेकर या प्रवाशाने लोकमतशी बोलताना दिली.

ठळक मुद्देइंजिनात बिघाड झाल्यामुळे विमान रद्द : प्रवाशांना वेदनादायी अनुभव

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्याचे कारण देत जेट एअरवेजच्या विमानात दोन तास बसवून खाली उतरविलेल्या २०० प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घातला. विमान कंपनीने सत्यस्थिती न सांगितल्यामुळे प्रवाशांना आलेला अनुभव अत्यंत वेदनादायी होता, अशी प्रतिक्रिया तुषार मंडलेकर या प्रवाशाने लोकमतशी बोलताना दिली. पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे प्रवाशांचा गोंधळ आणखी वाढला. अनेक स्थानिक प्रवासी घरी परतल्याची माहिती आहे.मंडलेकर यांनी सांगितले की, जेट एअरवेजचे नागपूर-दिल्ली विमान (९डब्ल्यू ०६५८) सायंकाळी ५.२० वाजता उड्डाण दिल्लीला भरणार होते. त्यासाठी प्रवाशांना ४.४५ वाजता विमानात बसविण्यात आले. वेळ निघून गेल्यानंतरही विमानाने उड्डाण न भरल्यामुळे प्रवासी क्रू मेंबरला विचारणा करू लागले. पण त्यांच्याकडून प्रवाशांना वारंवार उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. अखेर विमानाचे उड्डाण रद्द झाल्याचे सांगून प्रवाशांना विमानातून खाली उतरण्यास सांगितले. प्रवासी दोन तास विमानात बसून असताना एसी वा पंखे पूर्णपणे बंद होते. त्यामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास झाला. प्रवाशांना विमानातून खाली उतरविल्यानंतर नवीन बोर्डिंग पासेस देण्यात आल्या, पण हे विमान सहा तास उशिराने अर्थात रात्री १२ नंतर जाणार असल्याचे सांगण्यात आले.या दरम्यान कंपनीने लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांना खाण्यासाठी काहीही दिलेले नाही. प्रवाशांना आलेला अनुभव अतिशय त्रासदायक आणि वेदनादायी होता. अनेक प्रवाशांनी तिकिटाची रक्कम परत करण्याची मागणी केली. तुषार मंडलेकर या प्रवाशांनी टष्ट्वीटरवर केलेल्या तक्रारीनंतर जेट एअरवेज कंपनीने आमची चमू परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे म्हटले आहे. पण प्रवाशांना काहीही सोईसुविधा वा जेवण दिले नाही.

टॅग्स :AirportविमानतळJet Airwaysजेट एअरवेज