शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जरीपटका सामूहिक बलात्कार प्रकरण : चारही आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 23:54 IST

मित्रासोबत शरीर संबंध प्रस्थापित करणाऱ्या अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करणाऱ्या सर्व आरोपींना जरीपटका पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

ठळक मुद्दे१ ऑक्टोबरपर्यंत पीसीआर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मित्रासोबत शरीर संबंध प्रस्थापित करणाऱ्या अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करणाऱ्या सर्व आरोपींना जरीपटका पोलिसांनी मंगळवारी अटक केली. यश मेश्राम, अमित बोलके, अभिनेश देशभ्रतार आणि रितिक मोहरले अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर करून पोलिसांनी त्यांचा १ ऑक्टोबरपर्यंत पीसीआर मिळवला आहे.तक्रार करणारी मुलगी १५ वर्षाची असून तिच्या घराजवळच आरोपी यश मेश्राम राहतो. त्याच्यासोबत तिची मैत्री आहे. २५ ऑगस्टच्या सायंकाळी ६.३० च्या सुमारास यश आणि तक्रारदार मुलगी दुचाकीने फिरायला गेले. नारा गावाजवळच्या गंगोत्री लॉन जवळ निर्जन ठिकाणी या दोघांनी शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यांच्या मागावर असलेले आरोपी अभिनेश देशभ्रतार, अमित बोलके आणि रितिक मोहरले यांनी त्या दोघांना नको त्या अवस्थेत पकडले. त्यानंतर आरोपींनी तिला शरीरसुखाची मागणी केली. तिने नकार देताच तुला बदनाम करू आणि जीवे ठार मारू, अशी धमकी देऊन तिचे तोंड दाबून आरोपी देशभ्रतार, बोलके तसेच मोहरले या तिघांनी तिच्यावर जबरदस्तीने सामूहिक बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकीही दिली. बदनामीच्या आणि जिवाच्या धाकाने मुलगी गप्प बसली.म्हणून झाली तक्रारसोमवारी सकाळी ती मुलगी दूध आणायला गेली असता आरोपी देशभ्रतारने तिला गाठले. मागच्यासारखेच आज करायचे आहे, तू आज तयार राहा. ठरल्या वेळेत तू आली नाही तर जीवे ठार मारेन, अशी धमकी दिली. त्यामुळे पीडित मुलगी घरी आली आणि रडत बसली. तिच्या आईने तिला कारण विचारले असता तिने झालेला प्रकार सांगितला. मुलीच्या आईने आपल्या नातेवाईकांना घरी बोलावून सोमवारी रात्री जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पीडित मुलीचे बयाण नोंदविल्यानंतर पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला.आरोपींकडून गुन्ह्याची कबुलीपोलिसांनी चारही आरोपींना अटक केली. ते सर्व पाण्याच्या टँकरवर काम करतात. त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा १ ऑक्टोबरपर्यंत पीसीआर मिळवला. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांचा गुन्हेगारी अहवाल तपासला जात असल्याचे जरीपटका पोलिसांनी सांगितले.