शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

नितीन गडकरी यांच्या घरी जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 20:16 IST

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला देशभरात घवघवीत यश प्राप्त झाले आहे. या विजयाचे शिलेदार म्हणून नितीन गडकरी यांचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी गडकरी यांच्या रामनगर येथील निवासस्थानी हा विजय जल्लोषात साजरा केला.

ठळक मुद्देनेते, कार्यकर्ते यांची सकाळपासून वर्दळ : अभिनंदनाचा वर्षाव

लोकमत न्यूज नेटवर्क      नागपूर : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला देशभरात घवघवीत यश प्राप्त झाले आहे. या विजयाचे शिलेदार म्हणून नितीन गडकरी यांचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी गडकरी यांच्या रामनगर येथील निवासस्थानी हा विजय जल्लोषात साजरा केला. 

सकाळपासून देशभरातील निकालाचे कल हाती येऊ लागले आणि भाजपा मोठ्या विजयाकडे वाटचाल करू लागली. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आणि हे कार्यकर्ते गडकरी यांच्या घरी गोळा होऊ लागले. येथे निवासस्थानी मोठा स्क्रिन लावण्यात आला होता. येथे निकाल पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. सकाळी १० ते ११ वाजतापर्यंत देशातील चित्र जवळजवळ स्पष्ट झाले होते आणि भाजप व सहयोगी पक्षांना (एनडीए) स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून आले तसा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आणि या परिसरात एकच जल्लोष सुरू झाला. हा उत्साह टिपण्यासाठी वर्तमानपत्र तसेच इलेक्ट्रानिक्स प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी व कॅमेरामॅन यांनीही हजेरी लावली होती.सकाळी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले, आमदार प्रा. अनिल सोले, भाजपा शहराध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, अनिल बोंडे, महापौर नंदा जिचकार, नगरसेविका चेतना टांक, माजी खासदार अजय संचेती यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी गडकरी यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. शेफ विष्णू मनोहर, मैत्री परिवारचे चंदू पेंडके, विजय जत्थे, रवींद्र कासखेडीकर आदी चाहते व नातेवाईकांनीही घरी येऊन त्यांचे अभिनंदन केले. दुसरीकडे गडकरी यांचे चाहते व कार्यकर्त्यांच्या उत्साहाला जोम येऊ लागला. एकमेकांना विजयाच्या शुभेच्छा देत जल्लोष सुरू झाला. यामध्ये भाजप समर्थिन विविध संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचाही समावेश होता. उन्हाचा तडाखा वाढत असतानाही कार्यकर्त्यांचा जोश शिगेला पोहचला होता. दुपारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)च्या कार्यकर्त्यांची विजयी रॅली ढोलताशांसह वाजतगाजत-नाचत गडकरी वाड्यावर दाखल झाली. येथे आधीच तयार असलेल्या वाजंत्र्यांनीही सहभाग घेतला आणि जल्लोषाचा आवाज घुमू लागला. कार्यकर्त्यांनीही त्यावर फेर धरत विजय साजरा केला. गडकरी वाड्यावर उत्साहाचे हे चित्र दिवसभर सुरू होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालNitin Gadkariनितीन गडकरी