शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
3
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
4
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
5
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
6
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
7
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
8
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
9
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
10
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
11
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
12
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
13
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
14
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
15
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
16
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
17
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
18
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
19
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
20
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य

जैन विचारधारेच्या माध्यमातून नवीन ऊर्जा मिळते

By admin | Updated: October 5, 2015 03:15 IST

देशाच्या विकासात जैन धर्मीयांचे महत्त्वपूर्ण योगदान असून जैन विचारधारा ही सर्वांना नवीन ऊर्जा देते तसेच एकात्मिक भाव निर्माण करते, ....

मुख्यमंत्री : श्री शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरात पर्यूषण पर्वाचा समारोप नागपूर : देशाच्या विकासात जैन धर्मीयांचे महत्त्वपूर्ण योगदान असून जैन विचारधारा ही सर्वांना नवीन ऊर्जा देते तसेच एकात्मिक भाव निर्माण करते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केले. लक्ष्मीनगर येथील श्री शांतीनाथ दिगंबर जैन मंदिराच्या शांतीनाथ सभागृहात पर्यूषण पर्व समारोहानिमित्त सामूहिक क्षमायाचना तसेच समाज भूषण गौरव पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महापौर प्रवीण दटके, नगरसेवक संदीप जोशी, भगवान शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर समितीचे अध्यक्ष सुनील परसुले, कार्याध्यक्ष दीपक पनवेलकर, मनीष मेहता, गोपाल बोहरे, प्रेमचंद मिश्रीकोटकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. जगाला ऊर्जा व ताकद देण्याचे काम जैन धर्मगुरूंच्या माध्यमातून होत असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, अहिंसेच्या माध्यमातून समाजामध्ये एकात्मता भाव निर्माण करताना जैन समाज धार्मिक समारोहाच्या माध्यमातून सर्व जीवसृष्टीला आपले जीवन जगण्याचा अधिकार आहे, हा संदेश पोहचवण्याचे कार्य करीत आहे. समाजभूषण पुरस्काराच्या माध्यमातून समाजामध्ये जो चांगले काम करतो, अशा व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांच्या कार्याचा आदर्श व प्रेरणा इतरांनाही मिळावी हा संदेश अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून जातो, असेही ते म्हणाले. भगवान शांतीनाथ दिगंबर जैन समाजातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. अशा उपक्रमांसाठी आवश्यक असलेली संपूर्ण मदत देण्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्री १००८ भगवान शांतीनाथ दिगंबर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. दिगंबर जैन मंदिर पश्चिम विभागाचे अध्यक्ष सुनील परसुले यांनी स्वागत केले. तसेच ‘दिगंबर जैन मंदिर पश्चिम विभागातर्फे समाजातील गरीब विद्यार्थ्यांच्या निवासासाठी तसेच बाहेरून आलेल्या रुग्णांना थांबण्यासाठी व्यवस्था करण्यात येते. सध्याची जागा अपुरी पडत असल्यामुळे नागपूर सुधार प्रन्यासचा मोकळा भूखंड संस्थेस उपलब्ध करून द्यावा, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. अरविंद हनवते यांनी संचालन केले. यावेळी उपाध्यक्ष महेंद्र पेंढारे, सरिता जैन, किशोर मुठमारे, पद्माकर पळसखेडकर, विनय जुनोनकर, केवलचंद जैन, हेमंत लेठे, प्रदीप सोनटक्के, अशोक कान्हेड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)