शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

मानधन वाढीसाठी अंगणवाडी सेविकांचे जेलभरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 01:30 IST

मानधन वाढीसाठी ११ सप्टेंबरपासून आंदोलन करीत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी गुरुवारी जेलभरो करीत, प्रशासनाला चांगलेच जेरीस आणले.

ठळक मुद्देमुंडेंचा पुतळा जाळल्याने तणाव े तीन तास रोखला रस्ता े ३२२४ आंदोलनकर्ते ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानधन वाढीसाठी ११ सप्टेंबरपासून आंदोलन करीत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी गुरुवारी जेलभरो करीत, प्रशासनाला चांगलेच जेरीस आणले. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत तब्बल तीन तास संविधान चौक चौफेर घेरून धरला. जेलभरो दरम्यान महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा पुतळा जाळण्यात आला. पोलिसांशी बाचाबाची, धक्काबुक्की झाल्यानंतर ३२२४ आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.वाढलेली महागाई लक्षात घेता आणि शासनाने दिलेल्या जबाबदाºया बघता अंगणवाडी सेविकांना १०,५०० व मदतनीस यांना ८,५०० रुपये मानधन मिळावे या मागणीसाठी संविधान चौकात अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील संपूर्ण अंगणवाड्या बंद असून, ० ते ६ वयोगटातील बालकांचा पोषण आहार, पूर्व प्राथमिक शिक्षण, गरोदर व स्तनदा मातांची काळजी, किशोरवयीन मुलींना पोषक आहार आदी ठप्प पडला आहे. जिल्ह्यातील जवळपास ६० हजार बालके आंदोलनामुळे अंगणवाडीच्या लाभापासून वंचित आहे. अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनामुळे शासन आणि प्रशासन सुद्धा जेरीस आले आहे. कालपर्यंत शांततेत सुरू असलेले आंदोलन गुरुवारी काहिसे आक्रमक झाले होते. सकाळी ११.३० च्या सुमारास मोठ्या संख्येने महिला संविधान चौकात जमल्या होत्या. राज्यभरात जेलभरोचा इशारा दिल्याने महिलांनी संविधान चौकाला साखळी करून घेरले. मंत्री आणि सरकार विरोधात जोरदार घोषणांनी अख्खा परिसर दणाणला होता. त्यातच पंकजा मुंडे यांचा पुतळाही आंदोलकर्त्यांनी जाळल्याने पोलीस अािण आंदोलनकर्त्यांमध्ये काही काळ तणावसुद्धा झाला होता. तब्बल तीन तास रस्ता रोखून धरल्यानंतर पोलिसांनी ५० पेक्षा जास्त वाहनांमध्ये आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस लाईन टाकळी येथे नेले. तिथे आंदोलनकर्त्यांनी सभा घेऊन शासनाचा निषेध केला. शासन जोपर्यंत मागण्या पूर्ण करीत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलकर्त्यांनी दिला आहे. सोमवारपासून पुन्हा संविधान चौकात ठिय्या मांडणार असल्याचे आंदोलनाचे नेतृत्वकर्ते शाम काळे यांनी सांगितले.या आंदोलनात ज्योती अंडरसहारे, वनिता कापसे, प्रीती राऊळकर, मनिषा गजभिये, अनिता गजभिये, चंद्रप्रभा राजपुते, जयश्री चहांदे, चंदा मेंढे, माधुरी जामगडे, दिलीप देशपांडे यांनी नेतृत्व केले.प्रशासनाचा कारवाईचा इशाराराज्यात पहिल्यांदाच अंगणवाडी सेविकांच्या मानधनात ३० टक्के इतकी भरघोस वाढ झाली आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी आपल्या ठिकाणी रुजू व्हावे, अशी विनंती प्रशासनाने केली आहे. अन्यथा प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा जि.प. महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात यांनी दिला. ते म्हणाले की, जिल्ह्यात सध्या ३६ अंगणवाडी सेविका व मदतनीस रुजू झाल्या आहेत. आंदोलनामुळे बालकांवर अन्याय होत आहे. त्यासाठी पर्याय शोधण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. बालकांना पोषण आहार पुरविण्यासाठी ग्रामसेवक, महिला बचत गट अथवा गावातील महिलांना नियुक्त करण्यात येईल. महिलांना पोषण आहारासाठी १६० रुपये मानधन व प्रती मुलगा ६ रुपये आहार खर्च देण्यात येणार आहे.