शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपूरची शान असलेल्या जार्ई वाघिणीचे दीर्घ आजाराने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 13:10 IST

नागपुरातील पर्यटनस्थळांच्या यादीत अग्रणी असलेल्या महाराज बागेचे भूषण असलेल्या जाई वाघिणीचे गुरुवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ती गेल्या सहा महिन्यांपासून मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त होती.

ठळक मुद्देजुईच्या निधनानंतर अवघ्या चार महिन्यात जाईनेही सोडले प्राणदहा वर्षे सलग नागपूरकरांचे मन रिझवले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: नागपुरातील पर्यटनस्थळांच्या यादीत अग्रणी असलेल्या महाराज बागेचे भूषण असलेल्या जाई वाघिणीचे गुरुवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ती गेल्या सहा महिन्यांपासून मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त होती. तिच्यावर सुरु असलेल्या उपचारांनीही तिला आराम पडलेला नव्हता. ती १० वर्षांची होती. ८ नोव्हेंबर २००८ साली चंद्रपूरहून जाई आणि जुई या दोन वाघिणी महाराजबागेत आणण्यात आल्या होत्या. या दोन वाघिणींना पहायला दररोज शेकडो नागरिक या प्राणी संग्रहालयाला भेट देत होते. लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही या दोन्ही वाघिणी पाहण्याची उत्सुकता असायची.२००८ ते २०१७ या कालखंडात या दोन वाघिणी महाराज बागेची शान होत्या. २०१७ च्या नोव्हेंबर महिन्यात जुई वाघिणीचे निधन झाल्यानंतर जाई एकटी पडली होती. काही काळापासून तिला मूत्रपिंडाचा विकार जडला होता. तशातच तिला एकदा सापही चावला होता. या सगळ््या आघातातून ती मार्च महिन्यात थोडीफार सावरली होती. मात्र काही दिवसापासून तिची प्रकृती बिघडत गेली होती. तिचे खाणेपिणेही कमी झाले होते. अखेरीस बुधवारी रात्री तिची प्रकृती अधिकच बिघडत गेली आणि गुरुवारी पहाटे ५ वाजता तिने अखेरचा श्वास घेतला. जाईवर गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.तिच्या निधनाने नागपुरातील बालगोपाल व नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Maharajbagh Nagpurमहाराजबाग नागपूरTigerवाघ