शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जय शिवराय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 10:41 IST

राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे शिवजयंती महोत्सव बुधवारी नागपुरात महाल, गांधीगेट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मोठ्या उत्साहात आणि हर्षोल्लासात साजरा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे शिवजयंती महोत्सव बुधवारी महाल, गांधीगेट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मोठ्या उत्साहात आणि हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. अनेकजण ऐतिहासिक आणि पारंपरिक वेशभूषेत होते. अनेक चिमुकल्यांनी शिवाजी महाराजांची वेशभूषा केली होती. या निमित्ताने स्टेजवर सकाळपासूनच चित्तथरारक पारंपरिक कवायती, नृत्य, नाटक, योगासने, लेझिम आणि विविध कार्र्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. ढोलताशाच्या निनादात लोकांनी शिवाजी महाराजांचा जयघोष केला. नागपुरातील विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.सकाळपासूनच शिवाजी पुतळ्याजवळ लोकांनी एकत्र होण्यास सुरुवात झाली. लहानांपासून मोठ्यापर्यंत बहुतांश पारंपरिक वेशभूषेत होते. शिवाजी महाराजांची वेशभूषा आणि हातात तलवार असलेल्या एका चिमुकल्याने सर्वांचे लक्ष वेधले. बॅण्ड पथकाने कार्यक्रमात रंगत आणली. बॅण्ड पथकावर ताल धरत असताना सर्वांनी शिवाजी महाराजांचा जयघोष केला. अनेक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच मराठा विद्या प्रसारक समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केले. समाजातर्फे सकाळी ८ वाजता महिला आणि युवकांनी स्कूटर रॅली आणि सायंकाळी ४ वाजता शोभायात्रा काढली. रॅली आणि शोभायात्रेचा समारोप शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला.मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष राजे मुधोजी भोसले आणि राजा शिव छत्रपती प्रतिष्ठानतर्फे अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) नीलेश भरणे आणि महापौर संदीप जोशी यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आ. गिरीश व्यास, आ. अनिल सोले, आ. विकास ठाकरे, उपमहापौर मनीषा कोठे, माजी महापौर प्रवीण दटके, मनपा विरोधी पक्षनेते तानाजी वनवे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस, सेवादल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाराजांचा जयजयकार केला.सायंकाळपर्यंत अनेक संघटनांनी भेट दिली. शिवजयंती महोत्सव सायंकाळपर्यंत साजरा करण्यात आला.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज