शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जबलपूरचा गुंड अक्कूला पिस्तुलासह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 00:33 IST

पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत जखमी झाल्यानंतर फरार झालेला जबलपूरचा आरोपी अक्कू ऊर्फ आकाश गरकवार गुन्हे शाखा पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याला इंदोरा येथे पिस्तुल आणि काडतुसासह पकडण्यात आले आहे.

ठळक मुद्देपोलीस चकमकीत झाला होता जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत जखमी झाल्यानंतर फरार झालेला जबलपूरचा आरोपी अक्कू ऊर्फ आकाश गरकवार गुन्हे शाखा पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याला इंदोरा येथे पिस्तुल आणि काडतुसासह पकडण्यात आले आहे.अक्कूची जबलपूरमध्ये दहशत आहे. त्याच्या विरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह अनेक गुन्हे दाखल आहेत. डिसेंबर २०१७ मध्ये पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत तो जखमी झाला होता. त्याला गोळी लागली होती. सूत्रांनुसार जबलपूर पोलिसांनी त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. रुग्णालयात उपचारादरम्यान अक्कूने साथीदारांनी त्याला गोळी मारली नव्हती तर पोलिसांनी गोळी मारल्याचे सांगितले. त्याने न्यायालयातही हेच बयाण दिले होते. त्या आधारे जबलपूर पोलिसांचे सहा कर्मचारी निलंबित झाले होते. उपचारादरम्यान अक्कू जबलपूरच्या शासकीय रुग्णालयातून फरार झाला होता. त्यानंतर त्याने जरीपटका ठाण्यांतर्गत इंदोराच्या एका घरात आसरा घेतला होता. तो येथे उपचाराच्या बहाण्याने राहत होता. गुन्हे शाखेला त्याची माहिती मिळाली. त्यांनी अक्कूला पकडले. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ पिस्तुल आणि चार काडतुसे आढळली. पकडल्यानंतर अक्कूने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याने जबलपूर पोलिसांच्या ताब्यात दिल्यास जीवाला धोका असल्याचे सांगितले. त्याच्या मते पोलिसांनीच त्याला पळून जाण्यास सांगितले होते. अक्कूची जबलपूर, रायपूरसह अनेक शहरात दहशत आहे. तो कुख्यात गुंड आहे. अनेकदा तो पोलिसांसाठी डोकेदुखी ठरला आहे. ही कारवाई उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आचल मुदगल, सहायक पोलीस निरीक्षक नितीन पगार, हवालदार प्रकाश वानखेडे, सय्यद वाहिद, बलजीत ठाकूर, शाम गोरले यांनी पार पाडली.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसArrestअटक