शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार नव्हे शरद पवारांशीच केली होती सरकार स्थापनेची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नोव्हेंबर २०१९मध्ये राज्यात सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेच भाजपकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यावेळी भाजपची चर्चा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नोव्हेंबर २०१९मध्ये राज्यात सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेच भाजपकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यावेळी भाजपची चर्चा अजित पवार नव्हे; तर थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीच झाली होती. त्यांच्यासोबत अगदी खातेवाटपाची बोलणीदेखील अंतिम झाली होती, असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नागपुरातील एका कार्यक्रमात ते रविवारी बोलत होते.

नोव्हेंबर २०१९मध्ये जे काही घडले ते मी का केले, असे अनेकदा प्रश्न उपस्थित होतात. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आमची शिवसेनेशी बोलणी सुरू होती. मात्र, त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत जाण्याचे ठरविले असल्याचे आम्हाला कळाले. त्यानंतर १० ते १२ दिवस आम्ही विविध पर्यायांवर विचार केला व राष्ट्रवादीशी बोलणी केली. आम्हाला सरकार स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडूनच आला होता. आमची बोलणीदेखील जवळपास अंतिम झाली होती. सरकार बनविण्यासंदर्भात सर्व प्रक्रिया आम्ही पूर्ण केली. अगदी खातेवाटप, जिल्ह्यांचे पालकमंत्रीदेखील निश्चित केले. विशेष म्हणजे आमची चर्चा अजित पवारांशी नव्हे; तर शरद पवारांशी झाली व त्यांच्याशीच अंतिम बोलणी केली होती. राज्यात राष्ट्रपती शासन लागले व राष्ट्रवादीने त्यासाठी दिलेले पत्रदेखील मीच ‘ड्राफ्ट’ केले होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

‘फेसबुक लाईव्ह’ची ‘लिंक’ हटविली

देवेंद्र फडणवीस यांच्या या कार्यक्रमाचे ‘फेसबुक’वर ‘लाईव्ह’ सुरू होते. या कार्यक्रमात प्रसारमाध्यमांचे कॅमेरे नाहीत म्हणून मी दिलखुलासपणे बोलू शकतो, असे फडणवीस म्हणाले. शरद पवारांबाबत त्यांनी वक्तव्य केल्यानंतर काही वेळातच ‘फेसबुक लाईव्ह’च बंद झाले. याशिवाय ‘फेसबुक लाईव्ह’ची ‘लिंक’देखील हटविण्यात आली. अशा प्रकारे ‘लिंक’ हटविण्याचे गुपित काय, हा प्रश्न उपस्थित होत आहे.