शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:चेच वाहन ठरले ‘त्याचा’ काळ

By admin | Updated: September 27, 2015 02:19 IST

अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका विचित्र अपघातात एका माजी नगरसेवकाच्या तरुण मुलाचा करुण अंत झाला.

माजी नगरसेवकाच्या मुलाचा अपघाती मृत्यू : हिल टॉप येथील घटना नागपूर : अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका विचित्र अपघातात एका माजी नगरसेवकाच्या तरुण मुलाचा करुण अंत झाला. शनिवारी दुपारी ११.४५ च्या सुमारास हा अपघात घडला. रामनारायण शशिशंकर शुक्ला (वय १९) असे मृताचे नाव असून, माजी नगरसेवक शशिशंकर शुक्ला यांचा तो मुलगा होय.शुक्ला यांचे हिल टॉप पाण्याच्या टाकीजवळ जगदंबा ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. येथून ते बांधकामाशी संबंधित साहित्याचा पुरवठा करतात. शनिवारी दुपारी ११.४५ च्या सुमारास रामनारायण त्याची बोलेरो (एमएच ४०/ एन ३६९) ही मालवाहू वाहन रिव्हर्स घेत होता. रस्त्याची एक बाजू ओबडधोबड असल्यामुळे बोलेरो उजव्या बाजूने उलटली. ड्रायव्हर सिटच्या दाराच्या खिडकीतून रामनारायण डोके बाहेर काढून वाहन रिव्हर्स घेत असल्यामुळे त्याच्या डोक्याचा भाग बोलेरोखाली दबला. त्याला तातडीने बाजूच्या खासगी इस्पितळात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अपघातामुळे परिसरात तीव्र शोककळा पसरली. जयशंकर शामनाथ शुक्ला (वय ४२) यांच्या सूचनेवरून अंबाझरी पोलीस घटनास्थळी पोहचले. रामनारायण याचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा निष्कर्ष निघाल्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.व्यवसायाच्या भरभराटीसाठी रामनारायण मोठी धडपड करीत होता. ग्राहकांच्या आॅर्डरनुसार, तो स्वत:च वाहनात साहित्य भरून त्याची ने-आण करायचा. दिवसरात्र त्याची धावपळ सुरू राहायची. त्याचा असा अपघाती मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. (प्रतिनिधी)वाडीतही अपघातदुसरा अपघात शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास अमरावती मार्गावरील अशोका लॉनजवळ घडला. भरधाव कार (एमएच ३१/ जी ६१८७) चालकाने एका ५० ते ५५ वयोगटातील अनोळखी व्यक्तीला धडक दिली. त्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. वाडी पोलिसांनी आरोपीचालक अजय वसंतकुमार मुखर्जी (वय ३९, रा. गांधीचौक सदर) याला अटक केली.