शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस यांनीच ओबीसी समाजाला न्याय दिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 16:16 IST

शुक्रवारी बावनकुळे यांनी आक्रमकपणे देवेंद्र फडणवीस यांची बाजू लावून धरली व भाजपातील सर्व ओबीसी नेते फडणवीस यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले.

ठळक मुद्देव्यक्ती जातीने नव्हे तर कर्तृत्वाने मोठी होते ओबीसी नेते फडणवीसांच्या पाठीशी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपाचे बंडखोर नेते एकनाथ खडसे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेचे पडसाद पक्षातीलच ओबीसी नेत्यांमध्ये उमटत असून त्यांच्या वक्तव्याबद्दल पक्षात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.फडणवीस यांनी केवळ ओबीसी नेतेच नव्हे तर ओबीसी समाजाला देखील न्याय दिला, हे साऱ्यांनाच ठाऊक असताना खडसे आणि पंकजाताई यांनी असे विधान करणे दुर्देवी असल्याचे मत विदर्भातील ओबीसी नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. शुक्रवारी बावनकुळे यांनी आक्रमकपणे देवेंद्र फडणवीस यांची बाजू लावून धरली व भाजपातील सर्व ओबीसी नेते फडणवीस यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले. व्यक्ती जातीने नव्हे तर कर्तृत्वाने मोठी होते असेदेखील बावनकुळे यांनी म्हटले आहे.खडसे आणि पंकजा मुंडे यांनी त्यांच्या मनातील दु:ख मांडले.परंतु हे करीत असताना त्यांनी सरसकट पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना आरोपींच्या पिंजºयात उभे केले. यावेळी निवडून आलेल्या भाजप आमदारांमध्ये सर्वाधिक ओबीसी समाजाचे आहेत. मागील पाच वर्षांत ओबीसी समाजाच्या नेत्यांनाच मंत्रिमंडळात महत्वाची खाती मिळालीत. पक्षाच्या कोअर कमिटीत या समाजाला प्राधान्य दिले आहे.मी मागील २२ वर्षांपासून फडणवीस यांच्या संपर्कात आहे. त्यांचे कर्तृत्व मोठे आहे. पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर विधानसभेत फडणवीस यांनी ओबीसी विद्यार्थ्यांचाच प्रश्न मांडला होता आणि तो त्यांनी मार्गी देखील लावून दिला. महाराष्ट्राच्या इतिहासात ओबीसी समाजासाठी महामंडळ स्थापन करणारे फडणवीस हे पहिलेच मुख्यमंत्री आहेत, हे त्यांचे योगदान ओबीसी समाज कधीच नाकारणार नाही असे सांगत राज्यात सत्ता आली नसल्याच्या नाराजीतून ओबीसीचा मुद्दा समोर येत असल्याचे बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस