शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

ध चा मा झाला अन् चाकू चालला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - ध चा मा झाला अन् एका कुख्यात गुन्हेगाराने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका तरुणावर प्राणघातक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - ध चा मा झाला अन् एका कुख्यात गुन्हेगाराने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका तरुणावर प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात कुणाल कैलास रुढे (वय २७) हा गंभीर जखमी झाला. नवीन खापरी पुनर्वसन वसाहतीत गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास ही घटना घडली.

कुणाल रुढे राजारामनगरात राहतो. त्याच्या मैत्रिणीने जॉबची विचारणा केली होती. कुणालने अभ्यंकरनगरात एका ओळखीच्या ठिकाणी बोलतो. त्यासाठी पॅन किंवा आधार कार्ड आणि शैक्षणिक प्रमाणपत्र द्यावे लागेल, असे म्हटले. मानलेल्या बहिणीने तिच्या मैत्रिणीला हे सांगितले. एकदा कुणालसोबत (जॉबच्या ठिकाणी) जाऊन ये, असाही सल्ला दिला. कुणालसोबत जाऊन ये’ या वाक्याचा मैत्रिणीने चुकीचा अर्थ काढला. ते आरोपींना सांगितले. त्यावरून संतप्त झालेल्या आरोपी कुणाल भीमराव वाघमारे, आकाश मेघराज गडलिंग (दोघेही रा. खापरी पुनर्वसन) आणि रिशभ राजेश रामटेके (रा. विराज पार्क, सुदर्शन ले-आऊट) या तिघांनी कुणालवर हल्ला चढवला. आरोपींनी चाकू, काचेचा तुकडा आणि दगडाने गंभीर हल्ला केल्याने कुणाल गंभीर जखमी झाला. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. त्यानंतर आरोपी पळून गेले. जखमी कुणालला रुग्णालयात दाखल करून पोलिसांना कळविण्यात आले. मिळालेल्या माहितीवरून बेलतरोडीचे एपीआय घोडके यांनी हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. लगेच तिन्ही आरोपींच्या मुसक्या बांधण्यात आल्या. त्यांना आज न्यायालयात हजर करून त्यांचा पाच दिवसाचा पीसीआर मिळवला. पुढील तपास पीएसआय जायभाये करीत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी कुणाल वाघमारे सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत.

----

नंदनवनमध्ये पानटपरीचालकाला भोसकले

गुरुवारी रात्री नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाठोडा वस्तीत जुन्या वादातून एकाने पानटपरी चालविणाऱ्या तरुणाला भोसकले. सूरज मुन्नालाल मिश्रा (वय २७, रा. अबूमियानगर पारडी) असे जखमीचे नाव आहे. सूरज त्याचा मित्र सुगत बागडे तसेच आरोपी मामा ऊर्फ संदीप देवगीर गिरी (वय२७, रा. खैरीपुरा लालगंज) हे तिघे गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास वाठोेड्यातून दुचाकीने जात होते. अचानक त्यांच्यात वाद झाला अन् आरोपी मामा गिरीने सूरजला चाकूचे वार करून गंभीर जखमी केले. संतोष लालजी शुक्ला (वय ३६, रा. सिद्धेश्वरी नगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी आरोपी मामा गिरीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

---