वसीम कुरेशी ल्ल नागपूरडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आत शिरणे आता कठीण नाही. विमानतळाच्या शेजारी असलेले अतिक्रमण आणि सुरक्षा भिंतीची कमी उंची याला कारणीभूत आहे. नागपूर विमानतळ देशाच्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या विमानतळांपैकी एक आहे. परंतु येथे सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. वर्ष २००९ मध्ये एअरपोर्ट अॅथॉरिटीकडून हस्तांतरण झाल्यानंतर राज्य शासनाची कंपनी विमानतळाचे संचालन करीत आहे. कंपनी विमानतळ चालविण्यासाठी असमर्थ आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर विमानतळ परिसरात आढळलेल्या एका हरीणाला पकडणे शक्य झाले नाही.
एका उडीत विमानतळाच्या आत शिरणे शक्य
By admin | Updated: November 6, 2015 04:01 IST