शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतीपूरक व्यवसाय अभियान राबविणे आवश्यक

By admin | Updated: June 29, 2017 02:34 IST

शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे त्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न

अनुप कुमार : विदर्भ विकास मंडळाची बैठक लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे त्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याकरिता शेतीपूरक व्यवसाय अभियान राबविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी केले. विदर्भ विकास मंडळाची बैठक विभागीय आयुक्त, विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून सूचना करण्यात आल्या. विदर्भातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालण्याच्या दृष्टीने विविध पूरक व्यवसायांचा उल्लेख करून विभागीय आयुक्तांनी ‘तलाव तेथे मासोळी’ अभियानाची माहिती दिली. या अभियानाची पूर्वतयारी तसेच संबंधितांना प्रशिक्षण या अनुषंगाने आजवर झालेल्या कार्यवाहीचा त्यांनी उल्लेख केला. यावेळी तज्ज्ञ सदस्य अ‍ॅड. मधुकर किंमतकर, डॉ. कपिल चांद्र्रायण, डॉ. रवींद्र्र कोल्हे, डॉ. आनंद बंग, डॉ. किशोर मोघे, विदर्भ विकास मंडळाच्या सचिव डॉ. निरुपमा डांगे, सहायक संचालक अ. रा. देशमुख, उपायुक्त पी. एम. घाटे उपस्थित होते.मानव व वन्यप्राणी यांच्यातील होणाऱ्या संघर्षाला आळा बसावा, याकरिता उपाययोजना सुचविताना अनुप कुमार म्हणाले की, संरक्षित क्षेत्रातील वाघांची संख्या जास्त झाल्यानंतर काही वाघांचे दुसऱ्या संरक्षित क्षेत्रात स्थानांतरण करावे, विदर्भ विभागात संरक्षित वनक्षेत्रांचे एकत्रीकरण करण्यात यावे. विदर्भातील संत्रा उत्पादकांच्या समस्या व त्यावरील उपाय याबाबत ‘एनआरसीसी’ नागपूर संस्थेकडून अहवाल अपेक्षित आहे. या संस्थेने हे काम जलदगतीने पूर्ण करावे, यासाठी शासनस्तरावरून सूचना देण्यात याव्यात अशी विनंती आपण करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. बैठकीत विदर्भातील विकासाची योजना तयार करण्यासंदर्भातील अहवाल डिसेंबर २०१७ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती तज्ज्ञ सदस्य डॉ. कपिल चांद्रायण यांनी दिली .