शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो रेल्वेला मनपा बससेवेने जोडणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 02:34 IST

मेट्रो रेल्वे विश्वस्तरीय असून ही एक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. फिडर सर्व्हिस जेवढी सक्षम होईल, तेवढेच लोकांना जास्त जोडता येईल.

ठळक मुद्देमेट्रो रेल्वे फिडर सर्व्हिससह मनपा बससेवा, रेल्वे स्थानक, विमानतळ आणि बस टर्मिनल ते मेट्रो स्थानकापर्यंत जोडणे आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेट्रो रेल्वे विश्वस्तरीय असून ही एक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. फिडर सर्व्हिस जेवढी सक्षम होईल, तेवढेच लोकांना जास्त जोडता येईल. कोणतीही योजना अमलात आणणे सोपे आहे, पण त्याला लोकोपयोगी बनविणे तेवढेच कठीण आहे. मेट्रो रेल्वे फिडर सर्व्हिससह मनपा बससेवा, रेल्वे स्थानक, विमानतळ आणि बस टर्मिनल ते मेट्रो स्थानकापर्यंत जोडणे आवश्यक असल्याचे मत महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे (महामेट्रो) व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी येथे केले.महामेट्रोच्यावतीने आणि मनपा अणि वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूटच्या (डब्ल्यूआरआय) सहकार्याने ‘एनहान्सिंग द अ‍ॅक्सेस टू अ‍ॅन्ड कनेक्टिव्हिटी आॅफ नागपूर’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचा शुभारंभ हॉटेल सेंटर पॉर्इंट, रामदासपेठ येथे बुधवारी झाला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नागपूर स्मार्ट व सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सोनवणे, डब्ल्यूआयआयच्या प्रेरणा मेहता आणि छवी ढिंगरा प्रामुख्याने उपस्थित होते.दरदिवशी ३.५ लाख लोक प्रवास करणारदीक्षित म्हणाले, मेट्रो रेल्वेचा उपयोग योग्यरीत्या केल्यास त्याचा लोकांना फायदा मिळेल. नागपूर मेट्रो रेल्वेची लाईन वा स्टेशन बनविणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच लोकांना जोडणे जास्त महत्त्वाचे आहे. सध्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था १० टक्के आहे. त्यानंतरही मेट्रो रेल्वेची गरज का आहे, हे लोकांना अजूनही समजले नाही. लोकांना शहरात लांबचा प्रवास करताना दीड ते दोन तास लागतात. त्यामुळे वेळ वाया जातो आणि पैसा खर्च होतो, तसेच अपघात होण्याची शक्यता असते. वाहनांमुळे पर्यावरणाला धोका वाढतो. टीओडीवर चर्चा करताना ते म्हणाले, मेट्रो रेल्वेमुळे ५०० मीटरच्या कॅरिडोरमध्ये व्यावसायिक उपक्रम वाढतील. लोकसंख्येनुसार मेट्रोतून दरदिवशी ३.५० लाख लोक प्रवास करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.रामनाथ सोनवणे म्हणाले, स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून परिवर्तन होत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था १० वरून ३० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे आमचे लक्ष्य आहे. नागपूर शैक्षणिक आणि वैद्यकीय हब बनत आहे. या दिशेने आम्हाला ठोस कार्य करणे आवश्यक आहे.कार्यक्रमाची रूपरेखा संयुक्त महाव्यवस्थापक (मल्टीमॉडेल इन्टिग्रेशन) महेश गुप्ता यांनी सादर केली. संदीप बापट यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. या वेळी महामेट्रो रेल्वेचे महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.