शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

जीवघेणे ठरत आहे रेल्वे क्रॉसिंग

By admin | Updated: January 30, 2015 00:52 IST

कामठी-कळमना रोडवरील (येरखेडा रोड) रेल्वे क्रॉसिंगचे फाटक एकवेळा बंद झाल्यावर २० मिनिटानंतरच उघडते. त्यानंतर विस्कळीत होणारी वाहतूक सुरळीत होण्यासाठी तब्बल एक तासांचा वेळ जातो.

कळमना-कामठी रोड स्थित क्रॉसिंग : संतप्त नागरिकांचा आंदोलनाचा इशारा विहंग सालगट - नागपूरकामठी-कळमना रोडवरील (येरखेडा रोड) रेल्वे क्रॉसिंगचे फाटक एकवेळा बंद झाल्यावर २० मिनिटानंतरच उघडते. त्यानंतर विस्कळीत होणारी वाहतूक सुरळीत होण्यासाठी तब्बल एक तासांचा वेळ जातो. या क्रॉसिंगमुळे आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. काही तर परीक्षेपासून वंचित राहिले. काहींचे करिअर तर जीवावरही बेतले. विशेष म्हणजे, या क्रॉसिंगवरील वाहतुकीची कोंडी दूर करणे शक्य आहे, परंतु रेल्वे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. या क्रॉसिंगचे वैशिष्ट्य म्हणजे, येथून एनटीपीसीच्या (कोराडी) प्रकल्पापर्यंत कोळसा पोहचविण्यासाठी रेल्वे मालगाड्यांची वाहतूक होते. पूर्वी येथून मोजक्याच रेल्वे गाड्या धावत होत्या, परंतु कोराडी येथे नवीन प्रकल्प सुरू झाल्याने आणि कोळशाच्या मागणीत वाढ झाल्याने मालगाड्यांची संख्या पाचवरून वीस झाली आहे.प्रत्येक मालगाडीला हळू चालावे लागते आणि रेल्वे येण्याच्या काही वेळापूर्वी फाटक बंद केले जाते. रेल्वे प्रशासनाकडून एनटीपीसीशिवाय इतर रेल्वे गाड्यांसाठीही हा मार्ग उपलब्ध करून देत असल्याने समस्या निर्माण झाली आहे.जर ट्रेन कळमना स्टेशनवर तांत्रिक बिघाडामुळे थांबत असल्यास तर त्याचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग क्रॉसिंगवर असतो. यामुळे रेल्वे फाटक बंद ठेवल्या जाते. या क्रॉसिंगच्या काही अंतरावर दुसरे क्रॉसिंग आहे. हे क्रॉसिंग मानवरहित आहे आणि येथूनही कोळशाच्या रेल्वेची वाहतूक होते. या दोन्ही क्रॉसिंगच्या मध्ये एक १५ फुटाचा पूल आहे ज्याच्या खालून रेल्वे जाते. अशी होते वाहतूक विस्कळीतकळमना ते कामठीकडे जाण्यासाठी हा एकच मार्ग आहे. या क्रॉसिंगच्या दोन्हीकडे मोठ्या संख्येत शाळा व महाविद्यालये आहेत. जवळच रेल्वेचा गिट्टी यार्ड आहे. येथील ट्रकचीही वाहतूक याच मार्गावरून होते. कार्यालयीन वेळेत वाहनांची संख्या सर्वाधिक असते. ग्रामीण भागातील आॅटोरिक्षाचालक प्रवासी बसविण्याच्या स्पर्धेत वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली करतात.समस्येच्या निराकरणासाठी उड्डाण पूल आवश्यकसमस्याच्या निराकरणासाठी या मार्गावर उड्डाण पूल आवश्यक आहे. परंतु तूर्तास तरी रेल्वे फाटक बंद ठेवण्याची वेळ कमी करावी.कारण नसताना कळमना स्टेशनवर रेल्वे उभी करू नये.वाहतूक पोलीस आणि आरपीएफच्या जवानांनी मिळून वाहतूक सुरळीत करावी.