रमेश बंग : फेटरी येथे नेत्रतपासणी, दंतचिकित्सा शिबिरनागपूर : या सृष्टीचा खऱ्या अर्थाने मनसोक्त आनंद घेण्यासाठी दृष्टी चांगली असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हातारपणात बहुतेकांना आधाराची गरज असते. उतारवयात डोळेही कमजोर होत जाते. चांगल्या दृष्टीशिवाय कुणालाही सृष्टी पाहणे शक्य होत नाही. अशावेळी चष्म्याच्या रूपाने का होईना दृष्टी मिळते, असे प्रतिपादन माजी मंत्री रमेश बंग यांनी केले.नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील फेटरी येथील बीएमपीटी हॉलमध्ये नागपूर (ग्रामीण) राष्ट्रवादी काँग्रेस व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने नि:शुल्क नेत्रतपासणी व दंतरोग चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राजे मुधोजी भोसले, सौरभ मिश्रा, राजेंद्र मिश्रा, कलवंतसिंग तुली, डी. के. बोलेकर, किशनचंद लुल्ला, ठाकूर, किशोरसिंग बैस, डॉ. प्रमोद बनकर, नमिता रॉय, सतीश इटकेलवार, राणी यशोधरा भोसले, के. के. शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बंग म्हणाले, हल्ली स्पर्धेच्या युगात प्रत्येकाचे जीवन धकाधकीचे झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ची व कुटुंबीयांची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र, हल्ली स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण वाढत आहे. ही गंभीर बाब आहे, असेही ते म्हणाले.यावेळी परिसरातील शेकडो नागरिकांच्या डोळ्यांची तसेच दातांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. यातील ३५० गरजू नागरिकांना रमेश बंग यांच्या हस्ते चष्म्यांचे मोफत वितरण करण्यात आले. शिबिराच्या यशस्वितेसाठी मुकेश ढोमणे, प्रेम ढोणे, मोहन जाधव, प्रकाश लंगडे, सुनील नेरकर, वकील डोंगरे, प्रशांत पवार, सुनील डोडेवार, प्रमोद नागपुुरे, प्रमोद मिसाळ, रवींद्र खांबलकर, भोला येलेकर, भगवान मिसाळ, आनंदराव तकीद यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
दृष्टीविना सृष्टी बघणे अशक्य
By admin | Updated: August 24, 2014 01:11 IST