शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

वात्सल्याने वागणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला विसरता येणे अशक्य

By admin | Updated: June 19, 2015 02:45 IST

शोभाताई उबगडे यांच्या निधनाने विदर्भ साहित्य संघाचे नुकसानच झाले नाही तर अनेकांचा प्रेरणास्रोत हरविला आहे.

नागपूर : शोभाताई उबगडे यांच्या निधनाने विदर्भ साहित्य संघाचे नुकसानच झाले नाही तर अनेकांचा प्रेरणास्रोत हरविला आहे. त्यांचे जाणे चटका लावणारे आहे. साहित्य क्षेत्रात तळमळीने काम करणाऱ्या उबगडे यांचे जाणे सहजासहजी पचवता येण्यासारखे नाही. वात्सल्याने वागणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाला विसरता येणे अशक्य असल्याचे मत यावेळी शोकसभेत विविध मान्यवरांनी व्यक्त केले. विदर्भ साहित्य संघाच्यावतीने सांस्कृतिक संकुलातील सभागृहात शोभाताई उबगडे यांना श्रद्धांजली देण्यासाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन संस्थेचे कार्याध्यक्ष वामन तेलंग यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी प्रा. सुरेश द्वादशीवार म्हणाले, शोभातार्इंच्या निधनाने ही संस्था खचली आहे. सोज्वळ, शालीन कार्यकर्त्या म्हणून त्या सातत्याने या संस्थेत वावरल्या. ही संस्था म्हणजेच त्यांचे कुटुंब होते. संस्थेच्या परीक्षा समितीचे काम त्यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. त्यांच्या निधनाने संस्थेचे फार मोठे नुकसान झाले आहे. ज्येष्ठ समीक्षक डॉ. वि. स. जोग म्हणाले, शोभाताई या संस्थेची शुभशक्ती होती. त्यांचा वावर सुखद होता. संस्थेत आलेल्या प्रत्येकाची गरज ओळखून त्यांना मदत करण्यात शोभाताई नेहमीच अग्रेसर होत्या. त्या उत्तम लेखिका होत्या. सुप्रिया अय्यर, मेघना वाहोकार यांनीही शोकसंवेदना व्यक्त केल्या. डॉ. विलास चिंतामण देशपांडे म्हणाले, मराठी भाषेतील त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. अमराठी लोकांसाठी त्यांनी मराठीचे वर्ग चालविले. त्यांचे दातृत्व आणि औदार्य यांचा अनुभव आम्हाला वेळोवेळी आला आहे. उपाध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणाले, त्या कर्तव्यदक्ष गृहिणी आणि संस्थेतही वात्सल्याने वागणाऱ्या माता आणि प्रसंगी कान पकडणाऱ्या बापाच्या भूमिकेतही होत्या. त्यांचे जाणे आम्हाला पांगळे करणारे आहे. मधुकर कुकडे म्हणाले, अखंड महाराष्ट्र समितीच्या कार्यात त्यांना रस होता. त्यांचे जाणे एका मातेचे जाणे आहे. यावेळी गणेश नायडू, सुरुची डबीर, श्यामकांत कुळकर्णी यांनीही मत व्यक्त केले. वामन तेलंग म्हणाले, शोभाताई संस्थेच्या सरचिटणीस नव्हे पालकही होत्या. संस्था वाढविण्यात आणि माणसे जोडण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. प्रतिभावंत लेखक असलेल्या शोभातार्इंच्या जाण्याने पोरके वाटते. याप्रसंगी एक मिनिट मौन पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेचे संचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले. याप्रसंगी साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)