शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

माणुसकी जपलेला स्वरांचा हा सम्राटच

By admin | Updated: October 27, 2014 00:29 IST

काही वृक्ष फुले देतात तर काही रसरशीत फळे. अशा दोन्हीही वैशिष्ट्यांसह कायम सळसळत असलेला एक महान स्वरवृक्ष म्हणजे सर्वपरिचित अष्टपैलू कलावंत गुरुवर्य सूरमणी पं. प्रभाकर धाकडे!

डॉ. नारायणराव मंग्रुळकर : सूरमणी पं. प्रभाकरराव धाकडे यांचा अभीष्टचिंतन सोहळानागपूर : काही वृक्ष फुले देतात तर काही रसरशीत फळे. अशा दोन्हीही वैशिष्ट्यांसह कायम सळसळत असलेला एक महान स्वरवृक्ष म्हणजे सर्वपरिचित अष्टपैलू कलावंत गुरुवर्य सूरमणी पं. प्रभाकर धाकडे! या आंतरराष्ट्रीय कीर्तीमान कलावंताच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या शिष्य परिवारातर्फे त्यांचा भव्य आत्मिय सत्कार समारंभाचे आयोजन आज आय. एम. ए. सभागृहात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संगीततज्ज्ञ डॉ. नारायणराव मंग्रुळकर तर प्रमुख अतिथी म्हणून महापौर प्रवीण दटके, ज्येष्ठ विचारवंत अशोक गोडघाटे, आॅक्सफर्ड स्पीकर अकादमीचे संचालक संजय रघटाटे उपस्थित होते. याप्रसंगी पं. प्रभाकर धाकडे व उर्मिला धाकडे यांचा नेत्रदीपक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गुरुजींच्या सांगितीक कर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या ‘स्वरप्रवाह या गौरवग्रंथाचे प्रामुख्याने प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी कवी हृदय चक्रधर रचित आणि श्रीकांत पिसे यांनी स्वरबद्ध केलेले गुरुजींच्या अभीष्टचिंतनाचे सुमधुर गीत ‘कशी लाभली सूरमोहिनी गुरुजी तुमच्या करस्पर्शाने...’ विद्यार्थ्यांनी सादर केले. महापौर प्रवीण दटके यांनी गुरुजींबद्दल भावना व्यक्त करताना त्यांच्या संगीत सेवेबद्दल कृतज्ञतापूर्वक आदर व्यक्त केला. गुरुजींसारखे महान कलावंत संपूर्ण जगात नागपुरचे नाव मोठे करीत असताना त्यांना मोठे करण्याचे उत्तरदायित्व नागपूरकरांचेही आहे. संगीत क्षेत्रात नागपूर - विदर्भाचे योगदान फार मोठे आहे. कवी राजा बढे, ग्रेस, भट अशा महान प्रतिभावंतांनी कलाक्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे. लौकिक प्रसिद्धीपासून वंचित असलेल्या कलावंतांना प्रकाशात आणण्यासाठी स्वागतार्ह सूचनांचा स्वीकार मनपातर्फे करण्यात येईल, असे आश्वासन देत दटके यांनी गुरुजींना शुभेच्छा दिल्यात. अशोक गोडघाटे यांनी धाकडे कुटुंबीयांच्या सांगितीक योगदानाचा समर्पक आढावा घेत भावी जीवन प्रवासाबाबत त्यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. नारायण मंग्रुळकर यांनी एक माणुसकी असलेला, जपलेला हा स्वरांचा सम्राट असल्याचे मत व्यक्त केले. संगीत सुरेल होण्यासाठी वादी - संवादी स्वर जसे महत्वाचे असतात, तसेच जीवनसंगीत सुरेल होण्यासाठी पं. धाकडे यांना संसारात लाभलेली उर्मिला यांची साथ तेवढीच महत्त्वाची आहे, असे मत व्यक्त करताना त्यांनी धाकडे गुरुजींना शुभेच्छा दिल्यात. पं. धाकडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एवढे भव्य आयोजन केल्याबद्दल आनंद व समाधान व्यक्त केले. कुठलाही कलावंत हा जन्मभर विद्यार्थीच असतो. याच भावनेतून प्रत्येकाने आपल्या गुरुंबद्दल आदर बाळगून संगीतसाधना सातत्याने कायम ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. यानंतर गुरुजींच्या विद्यार्थ्यांनी सुमधुरतेने सादर केलेल्या हिंदी - मराठी गीतांच्या कार्यक्रमाने या समारंभाला उंची प्रदान केली. देवाशिष दास, तिलोत्तमा इंगळे, मानसी देशपांडे, संजय तलवार, शरद आटे, प्रीती धाकडे, सृष्टी सेन, रसिका करमाळेकर, गायत्री मजुमदार, मोहिनी बर्डे, मिलिंद जिभे, श्रेया खराबे, श्याम जैन, छाया वानखेडे, मोनिका देशमुख, प्रीती गजभिये, पराग काळीकर, अहिंसा तिरपुडे यांनी यावेळी गीते सादर केलीत. प्रमोद बावणे, भूपेश सवाई, श्रीकांत पिसे, योगेश हिवराळे यांनी विविध वाद्यांवर गायकांना सुयोग्य साथ केली. प्रास्ताविक शरद आटे यांनी केले. निवेदन महेश तिवारी यांनी तर आभार छाया वानखेडे यांनी मानले. याप्रसंगी ज्येष्ठ गायिका डॉ. सुहासिनी कोरटकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला संगीत क्षेत्रातील मान्यवर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती. (प्रतिनिधी)