शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलकांना गोळ्या घालण्याचा पोलिसांचा फलक ठरला वादग्रस्त

By admin | Updated: January 25, 2017 13:50 IST

गोळी चालविण्याचा फलक दाखविणे म्हणजे आंदोलकांवर पोलिस गोळी चालविणार आहे, असे नव्हे.

 
 
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २५ -  कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस आंदोलनकर्त्यांना फलक दाखवून, घोषणा करून सूचना देतात,  तशी ती केवळ एक सूचना होती. गोळी चालविण्याचा फलक दाखविणे म्हणजे आंदोलकांवर पोलिस गोळी चालविणार आहे, असे नव्हे. तसा आम्ही विचारही करू शकत नाही, असा खुलासा अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिले. 
हे राम, नथुराम नाटकाचा प्रयोग रविवारी येथील देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या प्रयोगाला विरोध करणाºयांना आंदोलकांसमोर शहर पोलिसांनी एक फलक दाखवला. 
‘सुनो बलवाँईयो आप का जमाव गैरकानुनी है। आप लोग यहाँसे चले जाव। नही तो आप पर पक्की गोली चलाई जायेंगी। 
चले जाव। चले जाव। चले जाव।’असे त्यात नमूद होते. 
लोकमतने आज त्या फलकासंबंधाचे वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली. पोलीस आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेत या वादग्रस्त फलकाचा विषय पत्रकारांनी लावून धरला. पोलिसांनी असा फलक दाखवण्यामागे काय उद्देश होता, गोळी घालण्याची ही धमकी पोलीस कशी देऊ शकतात, ते कोणत्या कायद्यात बसते, असे एक ना अनेक प्रश्न वरिष्ठ अधिका-यांना विचारले. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या उपस्थितीत उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त शर्मा म्हणाले, 
 गोळी घालण्याचा इशारा देणारे फलक दाखविणे म्हणजे धमकी नव्हे. आंदोलनाची परवानगी पोलिसांकडून घेतली नव्हती. त्यामुळे ते आंदोलन गैरकायदेशीर ठरते. कोणत्याही ठिकाणी गैरकायद्याची मंडळी जमविणे म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे. अशावेळी सुरक्षा यंत्रणेतर्फे सुरक्षासंबंधाने आंदोलनकर्त्यांना सूचना दिल्या जातात. त्याला जुमानत नसेल आणि परिस्थिती चिघळत असेल तर पोलीस आंदोलकांवर पाण्याचा मारा, लाठीमार, अश्रुधूर सोडतात. याचाच एक भाग म्हणून आम्ही सूचनांचे दोन फलक दाखविले. मात्र, दुसरा फलक कुणी ध्यानात घेतला नाही आणि या फलकाचा गैरसमज करण्यात आला. 
नागरिकांना जोडायचे आहे
आम्ही नागरिकांना जोडण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे धमकी देण्याचा किंवा गोळी झाडण्याचा विचारही करू शकत नाही. तो फलक दाखविण्यामागे पोलिसांचा उद्देश केवळ सूचना देण्यापुरताच मर्यादित होता, असा खुलासाही शर्मा यांनी शेवटी केला.