शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
6
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
7
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
8
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
9
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
10
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
11
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
12
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
13
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
14
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
15
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
16
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
17
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
18
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
19
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
20
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र

नोटीस बजावूनही ‘बायोमेडिकल वेस्ट’ उघड्यावर

By admin | Updated: May 27, 2017 02:45 IST

मेयोतील रुग्णांवर उपचार केल्यानंतर निघणारा घातक जैविक कचरा (बायोमेडिकल वेस्ट) गेल्या कित्येक महिन्यांपासून उघड्यावर टाकला जात असल्याचे

मेयोला प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस : कचरा विघटनाचा खर्च कोणाच्या खिशात? लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मेयोतील रुग्णांवर उपचार केल्यानंतर निघणारा घातक जैविक कचरा (बायोमेडिकल वेस्ट) गेल्या कित्येक महिन्यांपासून उघड्यावर टाकला जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच खळबळ उडाली. प्रदूषण नियंत्रण मंडळाची चमू बुधवारी मेयोत धडकली. जैविक कचऱ्याचा ढीग पहात आश्चर्य व्यक्त करीत नोटीस बजावली. परंतु दोन दिवसानंतरही कचऱ्याची उचल झाली नसल्याने मंडळ व रुग्णालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘बायो मेडिकल वेस्ट हॅण्डलिंग रुल्स’ अर्थात जैव वैद्यकीय कचरा हाताळणी नियमावली १९९८ मध्ये तयार करण्यात आली. केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने २० जुलै १९९८ रोजी अधिसूचना काढून हे नियम जारी केले. याची देखरेखची जबाबदारी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळावर आहे. परंतु या मंडळाची चमू रुग्णालयाची पाहणीच करीत नसल्याने गेल्या कित्येक महिन्यांपासून रुग्णालयाचा जैविक कचरा उघड्यावर टाकला जात आहे. रुग्णाच्या शरीरातील अवयव किंवा ट्युमर, इंजेक्शन, आयव्ही बॉटल, प्लास्टर, कापूस, बॅण्डेज, सिरिंज अशा सर्व वस्तू उघड्यावर पडून सडत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २४ मेच्या अंकात ‘ मेयोचे बायोमेडिकल वेस्ट’ उघड्यावर या शीर्षकाखाली प्रसिद्ध केले. या वृत्ताने पुन्हा एकदा प्रदूषण नियंत्रण मंडळाची झोप उडाली. कधी नव्हे ती या मंडळाची चमू रुग्णालयाची पाहणी करण्यास पोहचली. जैविक कचऱ्याच ढीग पाहून गंभीर झाली. रुग्णालय प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजावली. प्रशासनाने या नोटीसचे उत्तर दिले असले तरी शुक्रवारीही जैविक कचऱ्याचा ढीग कायम होता. विशेष म्हणजे, रुग्णालयातून रोज निघणाऱ्या कचऱ्याचे विघटन करण्याची जबाबदारी ‘सुपर हायजेनिक डिस्पोजल संस्थे’ची आहे. यासाठी रुग्णालय प्रशासन दरमहा ८० हजार रुपये खर्च करते. परंतु या कचऱ्याची उचलच होत नसल्याने हा खर्च कुणाच्या खिशात जातो यावरही प्रश्न उपस्थित केला जात आहे. रुग्णालय प्रशासनाने यावर चौकशीचे आदेश दिले असल्याचे समजते. चौकशीचे आदेश दिले आहेत रुग्णालयाचा कचरा उघड्यावर टाकला जात असल्याच्या प्रकरणावर चौकशीचे आदेश दिले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस प्राप्त झाली आहे. अनेक महिन्यांपासून कचऱ्याचा ढीग पडून असल्याने कचरा सहज उचलणे शक्य नाही. शनिवारी जेसीबी मशीनने तो उचलला जाईल. -डॉ. सुनील लांजेवार प्रभारी, अधिष्ठाता मेयो