शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

निलडोहच्या अंगणवाडीला ‘आयएसओ’

By admin | Updated: August 4, 2016 02:15 IST

अस्वच्छता, दुर्गंधी, भ्रष्टाचार अंगणवाड्यांना लागलेली ही विशेषणे. अंगणवाडीची चर्चा होताना दुरवस्थेवरच बोलले जाते.

इच्छाशक्तीच्या बळावर यश : विदर्भात पहिल्यांदा मिळाले मानांकन मंगेश व्यवहारे/ मुकेश कुकडे नागपूर अस्वच्छता, दुर्गंधी, भ्रष्टाचार अंगणवाड्यांना लागलेली ही विशेषणे. अंगणवाडीची चर्चा होताना दुरवस्थेवरच बोलले जाते. परंतु इच्छाशक्ती असेल तर अंगणवाडीला ‘आयएसओ’ मानांकन ही मिळू शकते. नागपुरातील निलडोह ग्रा. पं. अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी क्रं २६ च्या सेविकेने दाखविलेल्या इच्छाशक्तीच्या बळावर आयएसओ मानांकन मिळविण्यात यश आले. आयएसओ मानांकन मिळविणारी विदर्भातील ही एकमेव अंगणवाडी आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील निलडोह ग्रा.पं. अंतर्गत ही अंगणवाडी येते. सुरेखा चहांदे या येथे अंगणवाडी सेविका म्हणून २३ वर्षापासून कार्यरत आहे. त्यामुळे अंगणवाडीबद्दल त्यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. औरंगाबादमध्ये अंगणवाड्यांना आयएसओ मिळाल्याचे त्यांनी ऐकले होते. आपल्याही अंगणवाडीला आयएसओ मिळावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी प्रशासनापुढे प्रस्ताव ठेवला. त्यांना मान्यताही मिळाली. परंतु त्यासाठी आर्थिक मदत मिळाली नाही. लोकवर्गणीच्या माध्यमातून, स्वत:जवळचे पैसे खर्च करून, ग्रा.पं. च्या सहकार्याने अंगणवाडीची इमारत उभी केली. अंगणवाडींना मिळणारे मानांकन निव्वळ इमारत अथवा स्वच्छतेवर मिळत नाही. अंगणवाडीच्या माध्यमातून सहा प्रकारचे उपक्रम राबविले जातात. त्याची यशस्वीरीत्या अंमलबजावणी होणेही गरजेचे असते. यात शून्य ते सहा वर्ष वयोगटातील मुलांचे आरोग्य, शिक्षण याबरोबरच गर्भवती स्त्रिया, स्तनदा माता, किशोरवयीन मुलींना अनौपचारिक शिक्षण व पूरक पोषण आहार, लसीकरण आदीचा समावेश असतो. सुरेखा चहांदे यांनी आयएसओ संदर्भात नोंदणी केल्यानंतर तीन टप्प्यात आयएसओच्या पथकाने अंगणवाडीची तपासणी केली. पहिल्या टप्प्यात इमारत, स्वच्छता, व्यवस्थापन तपासले. दुसऱ्या टप्प्यात पोषण आहार, अंगणवाडीतून नागरिकांना मिळणारा लाभ याची पाहणी केली. तिसऱ्या टप्प्यात अंगणवाडीचे सर्वांगीण कार्य, रेकॉर्ड तपासले. तपासणी केल्यानंतर २०१५ मध्ये त्यांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले. येथे भेट दिल्यावर खरोखरच अंगणवाडी सेविकेने घेतलेली मेहनत दिसून येते. लहान मुलांसाठी हेल्दी आणि मनोरंजनात्मक वातावरण, स्वच्छता, नीटनेटकेपणा, टापटीप येथे बघायला मिळते. अंगणवाडीच्या कलरफुल भिंती मुलांचा उत्साह वाढवितात. आकार ओळख, अंक ओळख, मुळाक्षरे वाचन, अंक वाचन याचे कलरफुल चार्टने भिंती रंगलेल्या दिसतात. मुलांसाठी खेळणी, स्वच्छ स्वयंपाकगृह, शुद्ध पाणी, संगणक, टीव्ही हे सुद्धा अंगणवाडीत उपलब्ध आहे. किशोरवयीन मुलींसाठी स्तनदा मातांसाठी आरोग्य, कुपोषण, पोषण आहार, विविध योजनेचे चार्ट लावण्यात आले आहेत. अंगणवाडीच्या परिसरात गांडुळखत प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. छोटासे लॉन साकारले आहे. येथे शिकणारे विद्यार्थी बहुतांश एमआयडीसीत काम करणाऱ्या कामगारांचे आहेत. त्यांना पोषक वातावरण देण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला आहे.