शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळमधील ३०२ कोटीच्या पाणीपुरवठा योजनेत गैरव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 21:30 IST

३०२ कोटी रुपयाच्या बेंबळा-यवतमाळ अमृत पाणीपुरवठा योजनेमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे. या योजनेत निकृष्ट दर्जाचे पाईप वापरण्यात आले. ते पाईप पाणी व हवा यांचा दबाव सहन करू शकत नाही. त्यामुळे पाईप फुटतात व बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे शेतपिकाचे नुकसान होते असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात जनहित याचिका : निकृष्ट दर्जाचे पाईप्स वापरले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ३०२ कोटी रुपयाच्या बेंबळा-यवतमाळ अमृत पाणीपुरवठा योजनेमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे. या योजनेत निकृष्ट दर्जाचे पाईप वापरण्यात आले. ते पाईप पाणी व हवा यांचा दबाव सहन करू शकत नाही. त्यामुळे पाईप फुटतात व बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे शेतपिकाचे नुकसान होते असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.नाशिक येथील मे. पी.एल. अडके यांना या प्रकल्पाचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यासाठी पश्चिम बंगाल येथील मे. जय बालाजी इंडस्ट्रीज यांच्याकडून पाईप्स खरेदी करण्यात आले असून पाईप्सचा दर्जा तपासण्याची जबाबदारी मे. क्वॉलिटी सर्व्हिसेस अ‍ॅन्ड सोल्युशन्स यांच्याकडे आहे. परंतु, या तिघांसह सरकारी अधिकाऱ्यांनी नि:स्वार्थीपणे कर्तव्य बजावले नाही. त्यांनी आर्थिक गैरव्यवहार करून योजनेत निकृष्ट दर्जाचे पाईप्स वापरले. त्यामुळे पाणी सोडल्यानंतर निर्माण होणाऱ्या दबावामुळे पाईप्स फुटतात व आजूबाजूच्या शेतपिकाचे नुकसान होते. अशा घटना वारंवार घडत आहेत. योजनेतील पाईप्स दर्जा तपासण्यासाठी व्हीएनआयटीकडे पाठविण्यात आले होते. व्हीएनआयटीने १९ जुलै २०१८ रोजी अहवाल सादर करून पाईप्स निकषानुसार नसल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंत्यांनीही पाईप्सचा दर्जा निकृष्ट असल्याचा अहवाल सादर केला आहे. या सर्व बाबी लक्षात घेता प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी व दोषी फर्मस्ना काळ्या यादीत टाकण्यात यावे असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.राज्य सरकारला नोटीसयाचिकेवर बुधवारी न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने प्राथमिक मुद्दे लक्षात घेता राज्याचे नगर विकास मंत्री, पाणीपुरवठा मंत्री, मुख्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, यवतमाळ जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, नगर परिषद मुख्याधिकारी, मे. पी. एल. अडके, मे. जय बालाजी इंडस्ट्रीज व मे. क्वॉलिटी सर्व्हिसेस अ‍ॅन्ड सोल्युशन्स यांना नोटीस बजावून आठ आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. अ‍ॅड. शशिभूषण वहाणे यांनी याचिकेचे कामकाज पाहिले.बिल थांबविण्याची विनंतीयाचिकेवर निर्णय होतपर्यंत मे.पी.एल. अडके, मे. जय बालाजी इंडस्ट्रीज व मे. क्वॉलिटी सर्व्हिसेस अ‍ॅन्ड सोल्युशन्स यांची बिले थांबविण्याची विनंती सुनावणीदरम्यान न्यायालयाला करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने या विनंतीचा आदेशात उल्लेख करून त्यावर पुढच्या तारखेला विचार करण्यात येईल असे स्पष्ट केले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयYavatmalयवतमाळ