शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीशपदाच्या परीक्षेमधील उत्तरपत्रिका मूल्यमापनात घोळ; लोकसेवा आयोगाला नोटीस बजावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2023 22:25 IST

Nagpur News कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश व प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी यांची ६३ पदे भरण्याकरिता घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेमधील उत्तरपत्रिकांचे चुकीच्या पद्धतीने मूल्यमापन करण्यात आले, असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल एका याचिकेत करण्यात आला आहे.

नागपूर : कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश व प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी यांची ६३ पदे भरण्याकरिता घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेमधील उत्तरपत्रिकांचे चुकीच्या पद्धतीने मूल्यमापन करण्यात आले, असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल एका याचिकेत करण्यात आला आहे. न्यायालयाने सोमवारी याचिकेतील मुद्दे  गंभीरतेने घेऊन गृह विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांना नोटीस बजावली आणि यावर ३० मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

पीडित परीक्षार्थी नितीश अनिल शर्मा यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तिद्वय अतुल चांदूरकर व महेंद्र चांदवाणी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा अयोगाद्वारे घेण्यात आली. दिवाणी कायद्यांच्या पेपरमधील सूचनेनुसार चौथा व पाचवा प्रश्न प्रत्येकी १६ गुणांचा होता. परीक्षार्थिंना त्यात दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहायची होती. शर्मा यांनी ४(ए), ४(सी), ५(ए) व ५(सी) या प्रश्नांची उत्तरे लिहिली. परंतु, मूल्यमापकाने हा प्रत्येक प्रश्न आठ ऐवजी कमाल चार गुणांचा असल्याचे गृहित धरून मूल्यमापन केले व शर्मा यांना प्रत्येक उत्तरासाठी ३ गुण दिले. त्यामुळे शर्मा यांना १०० पैकी केवळ ५२ गुण मिळाले. परिणामी, त्यांचा अंतिम गुणवत्ता यादीतील क्रमांक घसरला व ते ७० व्या क्रमांकावर फेकल्या गेले. करिता, त्यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत उत्तरपत्रिका मिळविल्या असता मूल्यमापकाने केलेला घोळ उघडकीस आला. शर्मा यांच्यातर्फे ॲड. अनुप ढोरे यांनी कामकाज पाहिले.सुवर्ण पदक विजेते विद्यार्थीनितीश शर्मा यांनी एलएल. बी. पदवीमध्ये सुवर्ण पदक मिळविले आहे. ते पहिले मेरीट होते. पुढे त्यांनी एलएल. एम. पदवीही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. सध्या ते वकिली व्यवसाय करीत आहेत. त्यांना न्यायाधीश व्हायचे आहे. करिता, त्यांनी ही परीक्षा दिली. त्यांना मुलाखतीमध्ये ५० पैकी २७ गुण आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय