शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएस विनिता साहू यांची नागपुरात बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:08 IST

भंडाऱ्याच्या पोलीस अधीक्षक म्हणून वेगवेगळ्या उपक्रमामुळे प्रकाशझोतात आलेल्या आयपीएस अधिकारी विनिता साहू यांची आज नागपूरच्या पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. त्यांच्यासोबतच यापूर्वी नागपुरात परिमंडळ चारला उपायुक्त असलेले जी. श्रीधर यांचीही राज्य राखीव दल चारचे समादेशक म्हणून बदली झाली आहे.

ठळक मुद्देउपायुक्त म्हणून रुजू होणार : जी. श्रीधरही एसआरपीचे कमांडंट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भंडाऱ्याच्या पोलीस अधीक्षक म्हणून वेगवेगळ्या उपक्रमामुळे प्रकाशझोतात आलेल्या आयपीएस अधिकारी विनिता साहू यांची आज नागपूरच्या पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. त्यांच्यासोबतच यापूर्वी नागपुरात परिमंडळ चारला उपायुक्त असलेले जी. श्रीधर यांचीही राज्य राखीव दल चारचे समादेशक म्हणून बदली झाली आहे.२०१० च्या तुकडीच्या आयपीएस असलेल्या विनिता साहू यांनी सिंधुदुर्गला अतिरिक्त अधीक्षक आणि नांदेड तसेच वाशीम येथे पोलीस अधीक्षक म्हणून सेवा दिल्यानंतर त्यांची भंडारा येथे २०१५ मध्ये बदली झाली होती. विनिता साहू भंडारा येथे पोलीस अधीक्षक असताना २०१७ मध्ये त्यांनी मोबाईल पोलीस चौकीचा अनोखा उपक्रम राबवून राज्यच नव्हे तर देशपातळीवर सुरक्षा यंत्रणेचे लक्ष वेधले होते. दुर्गम भागातील गोरगरिब नागरिक अन्याय अत्याचार होऊनही पोलिसांपर्यंत पोहचू शकत नाही. त्यामुळे त्या भागातील गुन्हेगार निर्ढावतात. यावेळी या उपक्रमानुसार त्यांनी गावोगावी मोबाईल पोलीस चौकी निर्माण केल्या होत्या. त्यानुसार, दर शनिवारी पोलीस त्या चौकीत जाऊन बसायचे आणि नागरिकांच्या, विशेषत: महिला-मुलींच्या तक्रारी ऐकून घ्यायचे. त्या प्रत्येक तक्रारीवर साहू यांचे लक्ष राहत होते. त्यामुळे तक्रारीनुसार पोलीस संबंधित दोषींवर कारवाईही करायचे. त्यामुळे मोबाईल पोलीस चौकीचा उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला होता. अशाच अनेक उपक्रमांनी विनिता साहू यांनी राज्य पोलीस दलाचा भंडाऱ्याकडे लक्षवेध केला होता. आज पोलीस अधीक्षक/ उपायुक्त दर्जाच्या नऊ अधिकाऱ्यांच्या राज्य सरकारने बदल्या गेल्या. त्यानुसार विनिता साहू यांची नागपूरला उपायुक्त म्हणून बदली झाली आहे तर, यापूर्वी नागपुरात उपायुक्त म्हणून सेवा देणारे आणि नंतर बीडला पोलीस अधीक्षक म्हणून गेलेले जी. श्रीधर यांचीही नागपुरात बदली झाली आहे. ते एसआरपीएफच्या ग्रूप चारला कमांडंट म्हणून रुजू होणार आहेत. हसतमुख आणि मितभाषी मात्र कर्तव्यकठोर पोलीस अधिकारी म्हणून श्रीधर यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदली