शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
6
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
9
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
10
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
11
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
12
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
13
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
14
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
15
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
16
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
17
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
18
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
19
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
20
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग

लायसन्स नसेल तर पालकांना चालान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:36 IST

सुपुत्रांचा हट्ट पुरवत वडिलांनी घेऊन दिलेल्या भन्नाट वेगांच्या दुचाकींवर कसरती करणे,

सोमवारपासून महाविद्यालयांसमोर धडक तपासणी मोहीम : वाहतूक पोलीस विभागाने केले ‘अलर्ट’लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुपुत्रांचा हट्ट पुरवत वडिलांनी घेऊन दिलेल्या भन्नाट वेगांच्या दुचाकींवर कसरती करणे, झिकझॅक पद्धतीने, अतिवेगाने वाहन चालविणे अलीकडे अनेकांचे ‘थ्रील’ झाले आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी आता वाहतूक पोलीस विभागाने कंबर कसली आहे. यासाठी थेट शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करीत जे विद्यार्थी विना लायसन्स, विना हेल्मेट वाहन चालवीत असतील तर त्यांच्या पालकांवर चालान कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता पालकांनीच दक्ष होणे आवश्यक आहे. वाहतूक विभागाने यासंदर्भात शहरातील सर्व महाविद्यालयांना पत्र दिले असून, सोमवारपासून शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारावरच या तपासणी मोहिमेचा कार्यक्रमच आखला आहे. यासाठी वाहतूक विभागाच्या प्रत्येक युनिटवर जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) ही कारवाई केली होती. त्यावेळी शेकडो पालकांवर कारवाई झाली. गडद रंगाच्या फिल्मवर होणार कारवाई सर्वाेच्च न्यायालयाने वाहनांच्या काचांना गडद काळी फिल्म लावण्यावर बंदी घातली आहे. गाडीच्या आतील भागात काय आहे, हे स्पष्टपणे दिसण्यासाठी चारचाकी वाहनांच्या समोरील व मागील बाजूची काच ७० टक्के तर दोन्ही बाजूंच्या काचा ५० टक्के पारदर्शक असाव्यात, असा मोटार वाहन कायदा आहे. परंतु या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भात नुकतेच वृत्त प्रसिद्धही केले. याची दखल घेत वाहतूक विभाग अशा वाहनांवरही कारवाईची मोहीम हाती घेणार आहे.शिकाऊ परवानाधारकांनीही पाळावेत नियमशाळा-महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांकडे शिकाऊ परवाना (लर्निंग लायसन्स) आहे त्यांनी या संदर्भातील नियम पाळण्याचे आवाहनही वाहतूक विभागाने केले आहे. विद्यार्थ्यांनी शिकाऊ परवाना सोबतच बाळगावा, वाहनावर ‘एल’ चिन्ह लावावे, डबलसीट वाहन चालवू नये.विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठीच मोहीमनुकतेच शाळा-महाविद्यालयांना सुरुवात झाली आहे. यामुळे अनेक विद्यार्थी दुचाकी, कारचा वापर करतात. यात काही १८ वर्षांखालील मुलांचाही समावेश असतो. अशा विद्यार्थ्यांकडून अपघात होण्याची शक्यता अधिक असते. त्यांच्या व इतरांच्या सुरक्षिततेला घेऊनच ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यात शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेशद्वाराजवळच विद्यार्थ्यांची तपासणी केली जाईल. यात दोषी आढळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना जबाबदार धरून पुढील कारवाई करण्यात येईल. -जयेश भांडारकरवरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग