शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

श्रीसूर्या गुंतवणूकदार फसवणुकीचा खटला २७ पासून

By admin | Updated: January 20, 2016 04:01 IST

श्रीसूर्या समूह गुंतवणूकदार फसवणुकीचा खटला २७ जानेवारीपासून एमपीआयडी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.

नागपूर : श्रीसूर्या समूह गुंतवणूकदार फसवणुकीचा खटला २७ जानेवारीपासून एमपीआयडी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयात प्रारंभ होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार तूर्त २७ ते २९ पर्यंत साक्षीपुरावे नोंदवण्यासाठी तीन दिवसांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. या साठी सहा साक्षीदारांना समन्स पाठविण्यात आलेले आहे. समीर जोशी आणि त्याची पत्नी पल्लवी जोशी हे दोघे या महाघोटाळ्याचे म्होरके आहेत. त्यांनी मुदत ठेवींवर त्रैमासिक साडेबारा टक्के व्याजाचे आमिष दाखवून २००५ ते १४ सप्टेंबर २०१३ या काळात ५०९२ गुंतवणूकदारांकडून २४७ कोटी १४ लाख ५९ हजार ४४४ रुपयांच्या ठेवी गोळ्या केल्या होत्या. सोमलवाडा येथील रहिवासी हॉटेल व्यवसायी अमित गोविंद मोरे यांनी पाच लाखांच्या फसवणुकीबाबत तक्रार नोंदवताच राणा प्रतापनगर पोलिसांनी समीर जोशी आणि पल्लवी जोशी यांच्याविरुद्ध १४ सप्टेंबर २०१३ रोजी भादंविच्या ४०६, ४२०, ३४ आणि महाराष्ट्र गुंतवणूकदार (वित्तसंबंध) संरक्षण अधिनियम १९९९ च्या कलम ३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. आर्थिक गुन्हे पथकाकडे तपास सोपविण्यात आला होता. पुढे पुन्हा भादंविच्या ४०९, २०१, १२० ब , भारतीय रिझर्व्ह बँक कायद्याच्या ४५ एस, ५८ ब अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. समीरला १५ आॅक्टोबर २०१३ रोजी अटक करण्यात आली होती. तर पल्लवी ही २४ आॅक्टोबर २०१३ रोजी न्यायालयात शरण आली होती. सध्या पल्लवी जामिनावर आहे. या प्रकरणात समीर जोशी, पल्लवी जोशी यांच्यासह बिझनेस असोसिएटस् श्रीकांत प्रभुणे, निशिकांत मायी, दिलीप डांगे, मोहन पितळे, मुकुंद पितळे, नितीन केसकर, शंतनू कुऱ्हेकर, आनंद जहागीरदार, मनोज तत्वादी, भूषण पाटील आणि सुशील अरासपुरे, असे एकूण १३ आरोपी आहेत. या आरोपींपैकी समीर जोशी, तत्वादी आणि दोन एजंट हे कारागृहात आहे. इतर जामिनावर आहेत. आतापर्यंत १२४४ गुंतवणूकदार पुढे आले असून फसवणुकीची रक्कम १०० कोटींच्यावर गेलेली आहे. आतापर्यंत अंदाजे ३० कोटींवर मालमत्ताही जप्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. न्यायालयात आरोपींच्या वतीने अ‍ॅड. चंद्रशेखर जलतारे, अ‍ॅड. सुभाष घारे, अ‍ॅड. देशपांडे तर सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील बी. एम. करडे बाजू मांडणार आहेत. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक विष्णूपंत भोये हे आहेत. (प्रतिनिधी)