शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

‘शक्ती वाहिनी’च्या व्यवहारांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:11 IST

झिंगाबाई टाकळी परिसरातील ‘शक्ती वाहिनी’ या पतसंस्थेत व्यवस्थापक विजय भोयर याने मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार केल्याच्या प्रकरणाला लोकमतने गुरुवारी वाचा फोडताच,

ठळक मुद्देपोलीस, डीडीआर पथकाने उघडले कुलूप : कागदपत्रांची केली तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झिंगाबाई टाकळी परिसरातील ‘शक्ती वाहिनी’ या पतसंस्थेत व्यवस्थापक विजय भोयर याने मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार केल्याच्या प्रकरणाला लोकमतने गुरुवारी वाचा फोडताच, पोलीस व सहकार विभागातील अधिकारी सक्रिय झाले. पोलीस व जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील (डीडीआर) अधिकाºयांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी पतसंस्थेचे कार्यालय गाठले. अध्यक्ष प्रतिभा वैद्य यांना बोलावून कार्यालयाचे कुलूप उघडले. डीडीआरच्या पथकाने उपलब्ध कागदपत्रांची तपासणी केली; सोबत संचालक मंडळाने पतसंस्थेचा व्यवस्थापक विजय भोयर याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे लेखी आदेशही दिले. ‘शक्ती वाहिनी’नागपूर शहर महिला स्वयं सहायता गटाची पतसंस्था मर्यादितचे कार्यालय गेल्या २६ दिवसांपासून बंद आहे. व्यवस्थापक विजय भोयर बेपत्ता आहे. आपल्या परिश्रमाचे लाखो रुपये पतसंस्थेत अडकले असल्यामुळे शेकडो खातेधारकांची चिंता वाढली आहे. आपली फसवणूक झाल्याची तक्रार देऊनही मानकापूर पोलीस व जिल्हा उपनिबंधकांनी साधी दखलही घेतली नाही. या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल केला नाही. लोकमतने गुरुवारच्या अंकात या विषयाला वाचा फोडली.खातेदारांच्या पैशाचा परस्पर वापर‘शक्ती वाहिनी’ पतसंस्थेत अनागोंदी : पासबुकवर नोंद, पतसंस्थेत मात्र खातेच नाहीकमलेश वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झिंगाबाई टाकळी परिसरातील ‘शक्ती वाहिनी’ या पतसंस्थेत व्यवस्थापक विजय भोयर याने मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार केल्याचे समोर आले आहे. खातेधारकांकडून गोळा केलेल्या पैशाची पासबुकवर तर नोंद करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात त्या नावाचे खातेच उघडले नाही. एवढेच नव्हे तर खातेधारकांचे पैसे परस्पर वापरून नंतर मात्र त्यांना पतसंस्थेच्या खात्यातून पैसे परत केल्याचेही समोर आले आहे. बनावट कर्ज प्रकरणे करून कर्ज दिल्याचीही उदाहरणे समोर आली आहेत.झिंगाबाई टाकळी येथील शक्ती वाहिनी नागपूर शहर महिला स्वयंसाहाय्यता गटाची पतसंस्था मर्यादितचे कार्यालय गेल्या २६ दिवसापांसून बंद आहे. व्यवस्थापक विजय भोयर बेपत्ता आहे. आपल्या परिश्रमाचे लाखो रुपये पतसंस्थेत अडकले असल्यामुळे शेकडो खातेधारकांची चिंता वाढली आहे. या पतसंस्थेत खातेधारकांच्या ठेवींचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. खातेदारांचे पासबुक व लेजरबुकमध्ये असलेल्या नोंदींमध्ये मोठी तफावत आहे. खातेदारांनी जमा केलेले पैसे परस्पर वापरून नंतर मात्र पासबुकमधील नोंदीनुसार परतावा दिल्याची उदाहरणे आहेत. रामू पवार यांच्या खात्यात (लेजरबुक) ६५ हजार जमा असताना त्यांना १ लाख ३९ हजार ७२२ रुपयांचा चेक व्यवस्थापक विजय भोयर व अध्यक्ष प्रतिभा वैद्य यांच्या स्वाक्षरीने पतसंस्थेतर्फे देण्यात आला. यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे काही ग्राहकांकडून डेली कलेक्षन स्वीकारण्यात आले. त्यांना पासबुक देऊन त्यावर रकमेची नोंदणी करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात संबंधित खातेधारकांच्या नावे पतसंस्थेत खातेच उघडण्यात आलेले नाही. हिरालाल चंद्रवंशी यांच्या नावाने असलेल्या पासबुकवर १ लाख ७ हजार रुपये जमा केल्याची नोंद करण्यात आली आहे. प्रत्यक्षात या नावाने पतसंस्थेत खातेच उघडण्यात आलेले नाही. त्यानंतरही चंद्रवंशी यांची रक्कम त्यांना पतसंस्थेच्या खात्यातून परत करण्यात आली. व्यवस्थापक विजय भोयर याने पतसंस्थेच्या खात्यातील धनादेशाचा वापर वैयक्तिक कामासाठी केल्याच्याही नोंदी आहेत. याची सखोल चौकशी झाली तर बँक एन्ट्रीवरून हे स्पष्ट होऊ शकते.बनावट खातेदार दाखवून कर्ज दिलेव्यवस्थापक भोयर याने या पतसंस्थेत काही बनावट कर्ज प्रकरणे तयार करून कर्ज दिल्याची उदाहरणे समोर आली आहेत. अशा प्रकारे सुमारे १० लाखाहून अधिक रकमेचे कर्ज वितरित करण्यात आले. संबंधित कर्जाची रक्कम अद्याप पतसंस्थेत जमा झालेली नाही. संबंधित कर्जदार कोण आहेत, याचा थांगपत्ता नाही.महिलांना मोठा आर्थिक फटका‘शक्ती वाहिनी’ही महिला स्वयंसाहायता गटाची पतसंस्था असल्यामुळे येथे महिलांनीच मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. घरकाम करणाºया चहा-नाश्ता विकणाºया पासून तर किराणा दुकान चालविणाºया महिलांनी रोजच्या कमाईतून पैसे वाचवून या पतसंस्थेत ‘डेली कलेक्षन’ मध्ये पैसे भरले आहेत. मात्र, मेहनतीचे पैसे परत मिळानासे झाल्यामुळे या महिलांची आर्थिक शक्तीच निघून गेली आहे.आॅडिटर नियुक्त, आजपासून तपासणीलोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नागपूर शहर १ प्रकाश जगताप यांनी शुक्रवारी या पंतसंस्थेच्या आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी करण्यासाठी सोमाजी साखरे, लेखा परीक्षक श्रेणी १ अंतर्गत जिल्हा विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्था, नागपूर यांची नियुक्ती केली. साखरे हे शनिवारपासून पतसंस्थेचे लेखा परीक्षण करून चार-पाच दिवसात चौकशी अहवाल सादर करतील. या अहवालाच्या आधारावर आर्थिक घोटाळे करणाºया व्यवस्थापक भोयर याच्यासह इतर दोषींवर गुन्हे दाखल केले जातील.