शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालय तोडफोडीचा सीआयडीमार्फत तपास करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 20:41 IST

कुही येथील डॉ. विलास सेलोकर यांचे रुग्णालय व घरातील तोडफोड आणि दरोड्याचा सीआयडीमार्फत तपास करून दोषींवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल याचिकेत करण्यात आली आहे. डॉ. सेलोकर यांनी ही याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात याचिका : रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांचे कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुही येथील डॉ. विलास सेलोकर यांचे रुग्णालय व घरातील तोडफोड आणि दरोड्याचा सीआयडीमार्फत तपास करून दोषींवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल याचिकेत करण्यात आली आहे. डॉ. सेलोकर यांनी ही याचिका दाखल केली आहे.२० नोव्हेंबर २०१८ रोजी सेलोकर यांच्या साक्षी क्लिनिकमध्ये केजू गोरबडे या रुग्णाचा अकस्मात मृत्यू झाला. त्यानंतर त्याचे नातेवाईक व इतरांनी सेलोकर यांचे रुग्णालय, कार व घरातील साहित्यांची तोडफोड करून लाखो रुपयांचे नुकसान केले. तसेच, दागिने व रोख रक्कम चोरून नेली. त्यानंतर सेलोकर यांनी पोलिसांकडे तक्रार केली असता आरोपींविरुद्ध तातडीने एफआयआर नोंदविण्यात आला नाही. उलट रुग्णालय व घराला सील लावण्यात आले आणि सेलोकर व त्यांच्या कुटुंबीयांना दोन दिवस पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्या गेले. त्यामुळे सेलोकर यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी दिली. पोलीस अधीक्षकांच्या निर्देशावरून पोलिसांनी १४ जानेवारी २०१९ रोजी आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवला असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणावर सोमवारी न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने प्रकरणातील प्राथमिक तथ्ये लक्षात घेता रुग्णालय व घराचे सील तातडीने उघडण्याचा आदेश दिला. तसेच, सील लावण्यासाठी कोण जबाबदार आहे यावर उत्तर सादर करावे असे कुही पोलीस निरीक्षक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सांगितले. सेलोकर यांच्यातर्फे अ‍ॅड. नीलेश गायधने यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयdoctorडॉक्टर