शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

आॅरेंज सिटीला ‘एरोसिटी’ची ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काही वर्षांपूर्वीचे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरले आहे. फ्रान्सच्या डॅस्कॉल्ट एव्हिएशनच्या राफेल फायटर जेट विमानाचे सुटे भाग आणि याच कंपनीची फाल्कन बिझनेस विमाने मिहानमधील धीरुभाई अंबानी एरोस्पेस पार्कमध्ये तयार होतील. अनिल अंबानी यांनी या प्रकल्पासाठी नागपुरातील मिहानची निवड केली ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या प्रकल्पामुळे आॅरेंज ...

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : धीरुभाई अंबानी एरोस्पेस पार्कचा कोनशिला समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काही वर्षांपूर्वीचे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरले आहे. फ्रान्सच्या डॅस्कॉल्ट एव्हिएशनच्या राफेल फायटर जेट विमानाचे सुटे भाग आणि याच कंपनीची फाल्कन बिझनेस विमाने मिहानमधील धीरुभाई अंबानी एरोस्पेस पार्कमध्ये तयार होतील. अनिल अंबानी यांनी या प्रकल्पासाठी नागपुरातील मिहानची निवड केली ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या प्रकल्पामुळे आॅरेंज सिटी नागपूर आता एरोसिटी म्हणून जगभर ओळखले जाणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.विदर्भात विकासाला चालना मिळणार :गडकरीनितीन गडकरी म्हणाले, संरक्षण क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिल्यानंतर मिहानमध्ये सुरू होणाºया या प्रकल्पामुळे विदर्भातील विकासाला मोठी चालना आणि आर्थिक विकासाला नवी दिशा मिळेल. प्रकल्पात एप्रिल २०१८ पासून प्रत्यक्ष उत्पादन सुरू होणार आहे. त्यामुळे सहयोगी उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू होतील. रिलायन्स समूहाने लाखो भारतीयांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. धीरुभाई अंबानी यांनी दूरदृष्टीने उद्योग जगतात नावलौकिक मिळविला आहे.४०० सहयोगी कंपन्यांना कामे मिळणारलढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी हा प्रकल्प अतिशय महत्त्वपूर्ण आहे. यामुळे भारतातील सुमारे ४०० सहयोगी कंपन्यांना कामे मिळतील. सोबतच या प्रकल्पातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष १५ हजार जणांना रोजगार मिळणार आहे. प्रकल्पात पाच वर्षांनी दरवर्षी किमान २२ फाल्कन-२००० विमानांची निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.मिहान-सेझमधील १२६ एकरमध्ये धीरुभाई अंबानी एरोस्पेस पार्कचा कोनशिला समारंभ मुख्यमंत्री फडणवीस हस्ते शुक्रवारी पार पडला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. समारंभात फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली, केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, फ्रान्सचे राजदूत अ‍ॅलेक्झेंडर जिग्गलर, फ्रान्सच्या डॅसॉल्ट एव्हिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रापियर आणि रिलायन्स समूहाचे चेअरमन अनिल अंबानी, त्यांच्या आई कोकिळाबेन अंबानी, पत्नी टीना अंबानी, मुलगा अनमोल अंबानी प्रामुख्याने उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जगाला अधिक समृद्ध करण्यासाठी लोकशाही राष्ट्रांनी परस्परांना अधिक सहकार्य करण्याची गरज आहे. या प्रकल्पासाठी अनिल अंबानी यांनी नागपूरची निवड करण्याचा निर्णय अवघ्या पाच मिनिटात घेतला होता. आज या कार्यक्रमासाठी मुंबईहून येत असताना विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे विमान पुन्हा मुंबईला परतले. अखेर डॅसॉल्ट एव्हिएशनच्या फाल्कन विमानातून नागपूरला येण्याचा योग आला. आता याच विमानांची निर्मिती मिहानमध्ये पाच वर्षांत होईल. या वेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जा व पर्यटन मंत्री मदन येरावार, खा. कृपाल तुमाने, आ. सुधाकर देशमुख, आ. समीर मेघे, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, आ. जोगेंद्र कवाडे, आ. सुनील केदार, माजी आमदार रमेश बंग, उपमहापौर दीपराज पार्डीकर, प्रधान सचिव वलसा नायर सिंह, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, रिलायन्स ग्रुपचे वरिष्ठ अधिकारी आणि डॅसॉल्ट एव्हिएशनचे उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते.मेक इन इंडियांतर्गत प्रकल्प : अनिल अंबानीअनिल अंबानी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडियांतर्गत मिहानमध्ये संरक्षण उत्पादन क्षेत्रात खासगी उद्योगांच्या सहभागाचा एव्हिएशन क्षेत्रातील पहिला प्रकल्प आहे. राफेल फायटर विमानासह विमानाच्या सुट्या भागांची निर्मिती डॅसॉल्ट एव्हिएशनच्या संयुक्त भागीदारीतून सुरू होत आहे. प्रकल्प मिहानमध्ये सुरू व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह आणि उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा त्यांनी उल्लेख केला.दोन देशांमध्ये सहकार्याचेनवे दालन : फ्लोरेन्स पार्लीफ्लोरेन्स पार्ली म्हणाल्या, भारत आणि फ्रान्स या लोकशाही असलेल्या देशांनी एकत्र येऊन विविध क्षेत्रात सहकार्याचे नवे दालन सुरू केले आहेत. एरोस्पेस क्षेत्रास नागपूरपासून सुरुवात होत आहे. या क्षेत्रातील अतिउच्च तंत्रज्ञानाच्या आदानप्रदानाला या उद्योगामुळे प्रारंभ होत आहे. लढाऊ विमानांच्या निर्मितीत हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.‘डॅसॉल्ट’चे योगदान महत्त्वपूर्ण : एरिक ट्रापियरएरिक ट्रॅपियर म्हणाले, भारतीय हवाई दलासाठी लढाऊ विमाने उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रान्सदरम्यान झालेल्या महत्त्वपूर्ण करारामुळे या क्षेत्राच्या विकासामध्ये डॅसॉल्ट एव्हिएशनचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. एरोस्पेस उद्योगामुळे मिहानची ओळख जागतिक स्तरावर होणार आहे.अंबानी कुटुंबीय उपस्थितधीरुभाई अंबानी एरोस्पेस पार्कच्या कोनशिला समारंभात अनिल अंबानी यांच्या आई कोकिळाबेन अंबानी, पत्नी टीना अंबानी आणि मुलगा अनमोल अंबानी प्रामुख्याने उपस्थित होते. समारंभानंतर कोकिळाबेन अंबानी यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.