शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलसमर्थक शोमा सेनची अंतर्गत चौकशी प्रलंबितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 01:20 IST

नक्षली कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या प्रा.शोमा सेन यांच्याविरोधात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अद्यापपर्यंत अंतर्गत चौकशी सुरू केलेली नाही. यासंदर्भात पोलिसांकडून मूळ आरोपपत्र प्राप्त झालेले नाही. त्यामुळे विद्यापीठाने चौकशी सुरू केलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, शोमा सेन यांनी निवृत्तीनंतरचे लाभ देण्यात यावे, यासंदर्भात विद्यापीठाकडे अर्ज केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : निवृत्तीलाभ देण्यासंदर्भात केला अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नक्षली कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या प्रा.शोमा सेन यांच्याविरोधात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अद्यापपर्यंत अंतर्गत चौकशी सुरू केलेली नाही. यासंदर्भात पोलिसांकडून मूळ आरोपपत्र प्राप्त झालेले नाही. त्यामुळे विद्यापीठाने चौकशी सुरू केलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, शोमा सेन यांनी निवृत्तीनंतरचे लाभ देण्यात यावे, यासंदर्भात विद्यापीठाकडे अर्ज केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.नक्षली कारवायांमधील सहभागी, पुण्यातील ‘एल्गार’ परिषदेच्या माध्यमातून हिंसेला प्रोत्साहन देण्याच्या आरोपाखाली ६ जून रोजी पुणे पोलिसांनी प्रा.शोमा सेन यांना त्यांच्या निवासस्थानाहून ताब्यात घेतले होते. याप्रकरणी त्यांच्यासह एकूण पाच लोकांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, सुधीर ढवळे आणि रोना विल्सन यांचा समावेश होता. प्रा.सेन विद्यापीठाच्या सेवेत असल्याने अटकेनंतर ४८ तासांच्या आत त्यांचे निलंबन होणे आवश्यक होते. मात्र दबावगट सक्रिय झाल्याने विद्यापीठाने कारवाईस टाळाटाळ केली व निलंबन झालेच नाही. यासंदर्भात अखेर कुलगुरूंनी कायदेशीर सल्ला घेतला व प्रा.सेन यांना निलंबित करण्यात आले.या निलंबनानंतर विद्यापीठ वर्तुळात निरनिराळे मतप्रदर्शन झाले होते. डॉ.सेन यांच्या या कृत्यांसंदर्भात पोलिसांकडूनदेखील विद्यापीठाला सविस्तर पत्र पाठविण्यात आले. याच्या आधारावर विद्यापीठाने त्यांच्याविरोधात चौकशीसाठी अंतर्गत समितीदेखील गठीत करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी केवळ सेन यांच्याविरोधात लावलेली कलमे व झालेली कारवाई याचीच माहिती दिली आहे. पोलिसांची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. शिवाय आरोपपत्रदेखील विद्यापीठाला मिळालेले नाही. अशा स्थितीत चौकशी समिती स्थापन करणे योग्य होणार नाही. पोलिसांकडून कागदोपत्री ठोस दस्तावेज मिळाल्यानंतर अंतर्गत चौकशीला सुरुवात होईल, असे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी सांगितले.अद्याप ‘एनओसी’ दिलेली नाहीदरम्यान, ३१ जुलै रोजी प्रा.शोमा सेन या विद्यापीठातून निवृत्त झाल्या. त्यांंनी निवृत्तीनंतरचे लाभ मिळावे व निवृत्तीवेतन सुरू करण्यात यावे यासाठी विद्यापीठाकडे अर्ज केला आहे. मात्र विद्यापीठाने त्यांना अद्याप ‘एनओसी’ दिलेली नाही. हा अर्ज उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. शोमा सेन यांना निवृत्तीअगोदर निलंबित करण्यात आले होते. याची सविस्तर माहिती आम्ही सहसंचालकांना दिलेली आहे. आता तेच याबाबत निर्णय घेतील, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnaxaliteनक्षलवादी